सुशांत सिंग राजपूतने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारीत ‘एमएस धोनी द अनटॉल्‍ड स्‍टोरी’ या सिनेमात महत्वाची भूमिका साकारली होती. या सिनेमात सुशांतने जे धोनीचे काम रुपेरी पडद्यावर केले होते, त्याचे सर्वांनीच कौतुक केले होते. आज सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्याबाबतच्या काही आठवणींना उजाळा दिला जात आहे.

‘एमएस धोनी द अनटॉल्‍ड स्‍टोरी’ हा सिनेमा करण्यापूर्वी सुशांत आणि धोनी यांच्यामध्ये तीन महत्वाच्या बैठका झाल्या होत्या. या तीन बैठकांमधून सुशांतला धोनी उलगड गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे या तीन बैठका सुशांतसाठी सर्वात मोलाच्या ठरल्या होत्या.

‘एमएस धोनी द अनटॉल्‍ड स्‍टोरी’ हा सिनेमा झाल्यावर सुशांतच्या काही मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतींमध्ये सुशांतने धोनीबरोबरच्या आपल्या तीन बैठकांचा उल्लेख केला होता. याबाबत सुशांत म्हणाला होता की, ” ‘एमएस धोनी द अनटॉल्‍ड स्‍टोरी’ हा सिनेमा करण्यापूर्वी माझ्या आणि धोनीमध्ये तीन बैठका झाल्या होत्या. या तीन बैठकांमध्ये मला धोनी हा व्यक्ती म्हणून नेमका कसा आहे, हे समजून घ्यायला फार मोठी मदत झाली होती. आमच्या पहिल्या भेटीमध्ये धोनी त्याच्याविषयी फक्त बोलत होता. त्यावेळी मी फक्त ऐकून घ्यायचे काम करत होतो. कारण मला त्याच्याबद्दलची सर्व माहिती हवी होती. आमच्या दुसऱ्या भेटीमध्ये मला काही प्रश्न पडले होते, ते मी धोनीला विचारत होतो आणि धोनी मला त्या प्रश्नांची उत्तरे देत होता. त्यानंतर झालेल्या तिसऱ्या बैठकीमध्ये तर मला धोनीबाबतच्या जवळपास सर्वच गोष्टींचा उलगडा झाला होता. त्यामुळे धोनीबरोबरच्या या तीन बैठका मी कधीही विसरू शकणार नाही.”

बॉलीवूड स्टार सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे क्रिकेटविश्वही सुन्न झालेले पाहायला मिळत आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका रुपेरी पडल्यावर साकारणारा बॉलीवूडचा स्टार सुशांत राजपूतने आज आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. सुशांत सिंग राजपूतने त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही अभिनेता म्हणून केली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here