भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका रुपेरी पडल्यावर साकारणारा बॉलीवूडचा स्टार सुशांत राजपूतने आज आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सुशांतच्या आत्महत्येमुळे चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे.

सुशांत सिंग राजपूतने त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही अभिनेता म्हणून केली. धोनीच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा बॉलीवूडमध्ये झळकला होता. या सिनेमामध्ये धोनीची भूमिका सुशांतने साकारलेली होती. यावेळी सुशांतच्या या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते. पण आता सुशांतच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

सिनेमाच्या दुसऱ्या भागाचीही चर्चाएमएस धोनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता याचा सिक्वेल कधी येणार, याची चर्चा सुरु झाली होती. या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी धोनी आणि सुशांत यांच्यामध्येही काही बोलणे झाल्याचे म्हटले जाते. पण याबाबत अधिकृत माहिती नाही.

सुशांतने ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काय पो छे हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here