नवी दिल्ली: भारतात क्रिकेटचे वेड किती मोठ्या प्रमाणात आहे हे सांगण्याची गरज नाही. सुनिल गावसकर, , मास्ट ब्लास्टर पासून ते टीम इंडियाचा विद्यमान कर्णधार यांची लोकप्रियता प्रचंड आहे. भारतीय क्रिकेटमधील हे दिग्गज खेळाडू फक्त भारतातच नाही तर जगातील अन्य देशात तितकेच लोकप्रिय आहेत. अशाच एका क्रिकेट वेड्या देशात भारतीय खेळाडूंची नावे रस्त्याने दिली आहेत.

वाचा-
गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, रन मशीन विराट कोहली आणि १९८३च्या पहिल्या वर्ल्ड कप विजयाचे कर्णधार कपिल देव यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ज्या देशात क्रिकेट खेळ सुरुवातीच्या काळात खेळला जात होता, त्यापैकी एक असेलल्या ऑस्ट्रेलिया देशातील रस्त्यांना भारतीय खेळाडूंची नावे दिली आहेत.

मेलबर्नच्या पश्चिम उपनगरात रॉकबँक येथे एका हाऊस इस्टेटने रस्त्यांना सचिन, विराट आणि कपिल यांची नावे दिली आहेत. मेलबर्नच्या पश्चिम भागात भारतीय लोक मोठ्या प्रमाणात राहतात. येथील रस्त्यांची नावे तेंडुलकर ड्राइव्ह, कोहली क्रिसेंट, वॉव स्ट्रीट (स्टीव वॉ) , देव टेरेस (कपिल देव), कॅलिस वे (जॅक कॅलिस) अशी आहेत.

वाचा-

व्हिक्टोरिया प्रांतातील मेलबर्न शहरातील मेल्टन या उपनगरात हे रस्ते पाहायला मिळतात. येथील प्रॉपर्टी डेव्हलपर वरूण शर्मा यांनी सांगितले की, या गोष्टीला लोकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भारतीय संघ या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. तेव्हा विराटने या रस्त्यावरून गाडी चालवावी अशी इच्छा शर्मा यांनी व्यक्त केली.

सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्याशिवाय पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरम (अकरम वे), रिचर्ड हेडली (हेडली स्ट्रीट), सर गारफील्ड सोबर्स अशा खेळाडूंची नावे रस्त्यांना दिली आहेत. सिटी ऑफ मेल्टनच्या महापैर सीआर लारा कारली म्हणाल्या, आमच्या शहरातील रस्त्यांना नावे शक्यतो डेव्हलपर्सकडून दिली जातात. नंतर त्या नावांना पालिकेकडून मंजूरी दिली जाते.

क्रिकेट थिम असेलली ही नावे चाहत्यांमध्ये आधीपासूनच लोकप्रिय आहेत. लोकांकडून याबद्दल सकारात्मक प्रतिसाद येत आहे हे पाहून छान वाटत असल्याचे कारली म्हणाल्या.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here