बॉलीवूडचा स्टार अभिनेता सुशांत सिंग राजपूतने काल आत्महत्या केली आणि सर्वांनाच धक्का बसला. क्रीडा क्षेत्रानेही त्याच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली. आत्महत्या करण्याचा विचार भारताच्या एका क्रिकेटपटूच्या मनातही आला होता. आता सुशांतच्या मृत्यूनंतर तो काय म्हणाला, पाहा…

या सर्व परिस्थितीमधून भारताचा विश्वविजयी संघातील गेला आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये मनात नेमक्या काय भावना असतात. त्याचबरोबर या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे, हेदेखील या खेळाडूला माहिती होते. त्यामुळेच आपल्या मनात आलेला आत्महत्येच्या विचारापासून तो परावृत्त होऊ शकला होता.

हा खेळाडू दोन वर्षे त्रस्त होता. २००९ ते २०११ या दोन वर्षांच्या कालावधीत त्याला नैराश्याने ग्रासले होते. त्यामुळे या दोन वर्षांमध्ये आपण बाल्कनीमधून उडी मारून आपले जीवन संपवून टाकावे, असे विचार त्याच्या मनात येत होते, असे या क्रिकेटपटूने सांगितले होते. भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकात महत्वाची कामगिरी बजावली होती ती भारताच्या रॉबिन उथप्पाने. एका मुलाखतीमध्ये रॉबिन म्हणाला की, ” माझ्या आयुष्यातील दोन वर्षे फारच वाईट गेली. या दोन वर्षांत मी बाल्कनीमधून उडी मारून आत्महत्या करावी, असे वाचर माझ्या मनात येत होते. त्यावेळी मी क्रिकेटचाही विचार करत नव्हतो. हे दिवस फारच वाईट होते.”

सुशांतने आपल्या राहत्या घरी काल गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या या मृत्यूनंतर उथप्पा म्हणाला की, ” जर तुम्हाला कोणती समस्या जाणवत असेल आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर ती गोष्ट शेअर करायला हवी. कारण जी गोष्ट आपल्या आतमध्ये सुरु आहे ती बाहेर यायला हवी. एखादी गोष्ट तुम्ही वारंवार सांगू शकत नाही. पण जी गोष्ट तुमच्या डोक्यात सुरु आहे ती शेअर करून तुम्ही तुमचे मन शांत ठेवू शकता. आपण जेवढं समजत असतो त्यापेक्षा जास्त कधी कधी निराश झालेलो असतो. त्यामुळे या परिस्थितीमध्ये संवाद साधणे, हाच उत्तम पर्याय आहे. सुशांतबाबत जे काही झालं ते फार वाईट आहे. या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी देव त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here