या वर्षी जर आयपीएल खेळवले गेले नाही तर बीसीसीआयला ४ हजार कोटी रुपयांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काही करून या वर्षी आयपीएल खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे. पण बीसीसीआयच्या मार्गातही काही अडथळे नक्कीच आहे. जर ट्वेन्टी-२० विश्वचषक होऊ शकला नाही तरच आयपीएल खेळवले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे जर विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया सज्ज झाली असली तर आयपीएल या वर्षी खेळवण्याचे स्वप्न भंग होऊ शकते.
करोना व्हायरसमुळे भारतातील काही स्पर्धा रद्द करण्याचा पर्याय आता एका दिग्गज खेळाडूने सुचवला आहे. कारण सध्याच्या घडीला देशातील करोना बाधितांची संख्या वाढत आहे. ज्या देशांमध्ये क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या त्यापैकी काही देशांमध्ये खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बीसीसीआयने कोणतीही जोखीम उचलू नये, असे या दिग्गज क्रिकेटपटूला वाटत आहे.
दिग्गज खेळाडूने काय पर्याय सुचवला आहे…या दिग्गज खेळाडूने सांगितले की, ” सध्याच्या घडीला देशावर करोनाचे संकट आहेच. त्यामुळे बीसीसीआयने काही स्पर्धा रद्द करायला हव्यात. या स्पर्धांमध्ये विजय हजारे, दुलीप आणि देवधर करंडक यांचा समावेश व्हायला हवा. जेव्हा बीसीसीआय क्रिकेटचा मोसम सुरु करेल तेव्हा आयपीएल खेळवण्यावर त्यांचा भर असेल. पण त्यानंतर इराणी करंडक स्पर्धाही खेळवायला हवी. कारण सौराष्ट्र पहिल्यांदाच रणजी विजेता ठरला आहे. त्यामुळे इराणी स्पर्धा खेळण्याचा त्यांचा हक्क आहे. दुसरीकडे बीसीसीआयने रणजी करंडक आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धेवर जास्त भर द्यायला हवा.”
हा दिग्गज खेळाडू कोण…रणजी करंडक क्रिकेच स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या वसिम जाफरने बीसीसीआयला हे पर्याय सुचवले आहे. या पर्यायांवर बीसीसीआय विचार करणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times