करोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. त्याचबरोबर क्रिकेटची एकही मालिका भारतात होताना दिसत नाही. त्यामुळे क्रिकेटशी जोडलेला असलेला एक व्यक्ती अचडणीत सापडला होता. या व्यक्तीला भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने मोठी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे.

ही व्यक्ती भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा चांगला मित्र आहे. पण सध्या क्रिकेट स्पर्धा सुरु नसल्यामुळे त्याच्यावर वाईट वेळ आली होती. कारण या काळात कुटुंबियांचे दोन वेळचे जेवण कसे करायचे, हा त्याला मोठा प्रश्न पडला होता. पण यावेळी त्याच्यासाठी इरफान पठाण धावून आल्याचे पाहायला मिळत आहे.

वाचा-

ही व्यक्ती आहे तरी कोण…या व्यक्तीचे नाव आर. भास्करन असे असून ते चेन्नई येथे राहतात. चेन्नईमध्ये झालेल्या १९९३ सालापासूनचे सर्व आंतरराष्ट्रीय सामने त्यांनी पाहिले आहेत. त्याचबरोबर गेल्या १२ वर्षांपासून ते चामड्याच्या वस्तू दुरुस्त करण्याचे काम करत आहेत. भास्करन यांनी सचिनचे पॅडही दुरुस्त केले होते. त्यानंतर त्यांची आणि सचिनची गट्टी जमली. त्यामुळेच सचिनने त्यांना आयपीएलचे तिकिटही दिले होते.

धोनी हा चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार आहे. धोनी जेव्हा पहिल्यांदा चेन्नईमध्ये आला होता, तेव्हा भास्करन यांच्याबरोबर त्याने चहापान केले होते. तेव्हापासून त्यांची ओळक आहे. धोनी त्यांच्याबरोबर तमिळमध्ये बोलायचा प्रयत्न करतो आणि त्यांना आपला भाऊ मानतो. या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मैत्रीचे नाते आहे.

इरफानने काय केली मदत…भास्करन आणि त्यांच्या कुटुंबियांना घर चालवण्यासाठी समस्या येत असल्याचे इरफानला समजले होते. त्यानंतर इरफानने त्यांना २५ हजार रुपयांची मदत केल्याचे आता समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये इरफानने बऱ्याच जणांना मदत केली आहे. इरफानने बऱ्याच जणांना मास्कही वाटलेले आहेत. इरफान आणि त्याचा भाऊ युसूफ यांनी लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांना अन्नदानही केले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here