सुशांतच्या निधनानंतर क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला. त्यानंतर खेळाडूंनी सुशांतला श्रद्धांजली वाहिली होती. यामध्ये बऱ्याच नामांकित खेळाडूंचा समावेश होता. सानियानेही सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. पण सानियाने यावेळी सुशांतने आपल्याला एक वचन दिले होते, ही आठवण सर्वांबरोबर शेअर केली आहे.
सुशांत क्रिकेटबरोबर टेनिसचाही चाहता होता. ‘एमएस धोनी द अनटॉल्ड स्टोरी’ या सिनेमात धोनीची मुख्य भूमिका ही सुशांतने केली होती. या सामन्यापूर्वी सुशांत आणि धोनी यांच्या काही भेटीही झाल्या होत्या. या भेटीनंतर धोनी आणि सुशांत यांची चांगली मैत्रीही झाली होती. त्यामुळे सुशांतच्या जाण्यानंतर धोनीची प्रतिक्रीया का पाहायला मिळाली नाही, याचे आश्चर्य चाहत्यांना वाटत आहे. पण दुसरीकडे सानियाची प्रतिक्रायाही चांगलीच बोलकी आहे.
सुशांतने सानियाला कोणते वचन दिले होते…सानियाने सुशांतबाब म्हटले की, ” तू सर्वांना आनंद वाटत होता, त्यामुळे तु अशापद्धतीने जाशील, हो पचनी पडत नाहीए. त्यामुळेच तुझ्या निधनामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. हे जग तुझी किती आठवण काढतंय, याची तुला जाणीवही नसेल. तुझ्याबद्दल हे लिहिताना माझे हात थरथरत आहेत. तुझी एक आठवण अजूनही मनात आहे. एक दिवस आपण दोघे एकत्र टेनिस खेळू, असं तू म्हणाला होतास.”
सुशांतने सानियाला आपण दोघे एकत्र टेनिस खेळायला कोर्टवर उतरू असे वचन दिले होते. पण आता सुशांतचे हे वचन अधुरेच राहीले आहे. कारण ही गोष्ट करण्यासाठी सुशांत या जगात नाही. रविवारी आपल्या राहत्या घरी सुशांतने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times