बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. पण यानंतर भारतातील एक व्यक्ती बॉलीवूडमधील करण जोहरवर चांगलीच भडकलेली पाहायला मिळत आहे. फिल्म इंडस्ट्री करण जोहरच्या बापजाद्यांची मालमत्ता आहे का, असा सवालही तिने यावेळी विचारला आहे. सुशांतची आत्महत्या आणि करण जोहर यांचा नेमका काही संबंध आहे का… अशी चर्चाही काही चाहते आता करताना दिसत आहेत.

सुशांत हा एक छोट्या गावातून आला होता. पण बॉलीवूडमध्ये तर लॉबी हा प्रकार पाहायला मिळतो. बऱ्याच जणांच्या मुला-मुलींना, भाऊ-भाच्यांना सहज काम मिळते, पुरस्कारही मिळतात. घराणेशाही मोठ्या प्रमाणात बॉलीवूडमध्ये असल्याचे पाहायला मिळते. पण जे लहान शहरांतून आलेले असतात त्यांना या गोष्टींसाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. पण काही वेळा मेहनत करूनही या गोष्टी कधी कधी त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे ते निराशेने ग्रासले जातात.

सिनेसृष्टीतील काही जणांनीच सुशांतवर आत्महत्या करण्याची वेळ आणली आहे. असं अनेकांनी म्हटलं आहे. अभिनेत्री कंगना रनौट हिनं देखील बॉलिवूडच्या घराणेशाहीवर हल्ला चढवत सुशांतची आत्महत्या नसून प्लॅन मर्डर असल्याचं म्हटलं आहे. कंगनाच्या टीमकडून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. व्हिडिओत कंगनाना प्रचंड चिडलेली दिसून येतेय. त्याचबरोबर या घराणेशाहीमधून लहान शहरांतून आलेल्या लोकांना किती त्रास दिला जातो, हेदेखील कंगनाने आपल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. कंगणाच्या या व्हिडीओनंतर एक भारतीय महिला करण जोहरवर चांगलीच भडकलेली पाहायला मिळत आहे.

भारताची महिला कुस्तीपटू आणि भाजपाची नेता बबिता फोगट या सर्व गोष्टींवर चांगलीच भडकलेली पाहायला मिळत आहे. सुशांतच्या निधनाचा तिलाही मोठा धक्का बसला आहे. यावेळी बबिता म्हणाली की, ” मला कंगना तुझं म्हणणं पटतंय. बॉलीवूडचा घराणेशाहीचा मोठा आजार झालेला पाहायला मिळतो. त्यामुळेच इथे लहान शहरांतून आलेल्या लोकांना चागली वागणूक मिळताना दिसत नाही. फिल्म इंडस्ट्री ही कोणाच्या बापजाद्यांची मालमत्ता नाही.”

बबिताने यावेळी कंगणारा पाठिंबा देत असताना बॉलीवूडमधील निर्माता असलेल्या करण जोहरवर जोरदार टीका केली आहे. फिल्म इंडस्ट्री करण जोहरच्या बापजाद्यांची मालमत्ता आहे का, असा सवालही तिने यावेळी उपस्थित केला आहे. बबिता म्हणाली की, ” कोण आहे का करण जोहर? फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय घाणेरडापणा करुन ठेवलाय. फिल्म इंडस्ट्री ही काय करण जोहरच्या बापजाद्यांची मालमत्ता आहे का? कोणी करणला सडेतोड उत्तर का देत नाही? माझी बहीण कंगना रनौट वाघिण आहे आणि तीच करणला योग्य ते उत्तर देत आहे. या गोटाच्या सर्व चित्रपटांवर बहिष्कार घालायला हवा.”

बबिताने आरोप करताना थेट करण जोहरचे नाव घेतले आहे. करण हा फिल्म इंडस्ट्रीमधील मोठी व्यक्ती असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता यापुढे नेमके काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here