Authored by prasad lad | Maharashtra TimesUpdated: Sep 4, 2022, 8:13 PM

ind vs pak : रोहित शर्माने भारताला यावेळी दणदणीत सुरुवात करून दिली. रोहितने या सामन्यात १६ चेंडूंत २८ धावा केल्या, यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. रोहितने यावेळी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. या लढतीत रोहितने आता कोणता विश्वविक्रम रचला आहे, जाणून घ्या…

 

asia cup
सौजन्य-ट्विटर
दुबई : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने धडाकेबाज फटकेबाजी केली. रोहितला यावेळी अर्धशतक झळकावता आले नसेल तरी त्याने इतिहास रचला आहे. कारण या सामन्यात रोहितने नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

रोहित शर्माने भारताला यावेळी दणदणीत सुरुवात करून दिली. रोहितने या सामन्यात १६ चेंडूंत २८ धावा केल्या, यामध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. रोहितने यावेळी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विश्वविक्रम यापूर्वी न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सूझी बेट्सच्या नावावर होता. आतापर्यंत सूझीने ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये ३५३१ धावा केल्या होत्या. गेल्या सामन्यात रोहितने ३५०० धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यावेळी रोहितच्या नावावर ३५२० धावा होत्या. रोहितने आजच्या सामन्यात २८ धावा केल्या आणि एकूण ३५४८ धावा त्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम रोहितच्या नावावर असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आशिया कपमध्ये एकही मॅच गमावलेली नाही. टी-२० मध्ये चार शतक करणारा तो एकमेव फलंदाज आहे. २०१८ साली पाकिस्तानची त्याने दाणादाण उडवली होती. तेव्हा हफीजच्या संघाचा पराभव झाला होता.

हा सामान सुरु होण्यापूर्वी रोहितला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने टार्गेट केले होते. शोएब म्हणाला की, ” रोहित शर्मा हा सध्या भारताचा कर्णधार आहे. पण तो कर्णधारपदाचा आनंद घेताना दिसत नाही. तो बराच थकलेला दिसतो. त्यामुळे त्याला हटवून त्याच्या जाही एक सक्षम पर्याय भारताला ठेवता येऊ शकतो. भारताकडे सध्याच्या घडीला कर्णधारपदासाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे आणि म्हणजे हार्दिर पंड्या. कारण हार्दिकने दुखापतीनंतर जोरदार कमबॅक केले आहे. आयपीएलमध्येही त्याने दमदार नेतृत्व केले आणि संघाला जिंकवून दिले. त्याचबरोबर भारताचे नेतृत्व करण्यासाठी तो सक्षम आहे. त्यामुळे रोहितच्या जागी जर हार्दिकला संधी देण्यात आली तर तो नक्कीच चांगले निकाल देऊ शकेल.” पण रोहितने दमदार खेळी साकारत त्याला तोडीस तोड उत्तर दिले आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

121 COMMENTS

  1. get cheap propecia without a prescription [url=https://propecia365.top/]how to buy generic propecia price[/url] can i purchase cheap propecia without prescription

  2. where to buy cheap pregabalin no prescription [url=https://pregabalin2023.top/]cost cheap pregabalin tablets[/url] where can i get generic pregabalin price

  3. order generic lyrica without prescription [url=https://lyrica24.top/]how to get cheap lyrica online[/url] where can i buy cheap lyrica tablets

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here