वाचा-
‘काय पो छे’ या चित्रपटात सुशांतने ज्या मुलाला प्रशिक्षण दिले होते त्याचे नाव (चित्रपटातील नाव अली) असून तो एक जलद गोलंदाज आहे आणि महाराष्ट्राकडून खेळतो.
वाचा-
२०२० च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने २० लाख रुपयांची बोली लावून दिग्विजयला () करारबद्ध केले होते. सुशांतच्या निधनावर दिग्विजय म्हणाला, सुशांतच्या निधनाचे फार दु:ख वाटते. ही खंत नेहमी वाटत राहिली की माझी आणि त्यांची भेट झाली नाही. आयपीएलमध्ये मुंबई संघात माझी निवड झाल्यानंतर विचार केला होता की स्पर्धा सुरू झाल्यानंतर मी सुशांत भाईला भेटेन आणि क्रिकेटपटू झाल्याची बातमी सांगेन.
‘काय पो छे’ चित्रपटाच्या वेली सुशांत भाईने मला विचारले होते की, तु मोठा झाल्यावर कोण होणार आहेस. यावर मी क्रिकेटपटू होणार असल्याचे उत्तर दिले होते. मी त्यावेळी त्यांना सांगितले होते की, जेव्हा क्रिकेटपटू होईन तेव्हा तुम्हाला नक्की भेटेन. पण मी आता त्यांना कधीच भेटू शकणार नाही. याचे दु:ख नेहमीच राहील.
वाचा-
दिग्विजय देशमुखने २०१९च्या रणजी ट्रॉपी स्पर्धेतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर १२ नोव्हेंबर २०१९ मध्ये मुश्ताक अली ट्रॉफीतून टी-२० पदार्पण केले. दिग्विजयने आतापर्यंत ७ टी-२० सामन्यातून ९ विकेट घेतल्या. तर एका प्रथम श्रेणी सामन्यात सहा विकेट घेतल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times