वाचा-
क्रिकेटच्या इतिहासात असे फक्त ५ गोलंदाज झाले आहेत ज्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. या पाच पैकी ४ जलद गोलंदाज आहेत तर फक्त एक फिरकीपटू आहे. जाणून घेऊयात नो बॉल न टाकणाऱ्या पाच दिग्गज गोलंदाजांबद्दल…
वाचा-
वेस्ट इंडिजचे माजी फिरकीटपटू यांनी संपूर्ण क्रिकेटमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. अशी कामगिरी करणारे ते पहिले गोलंदाज होते. इतक नव्हे तर गिब्स यांनी कसोटीत ३०० विकेट घेतल्या. अशी कामगिरी करणारे ते दुसरे गोलंदाज होते. पहिल्यांदा ३०० विकेट घेण्याची कामगिरी इंग्लंडच्या फ्रेड टूमॅन यांनी केली होती. गिब्स यांनी ७९ कसोटी आणि ३ वनडे मॅच खेळल्या. यात त्यांनी एकही नो बॉल टाकला नाही. कसोटीत त्यांनी एकूण ३०९ विकेट घेतल्या.
वाचा-
क्रिकेटमध्ये अशी अनोखी कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये भारताचे माजी कर्णधार यांचा समावेश आहे. कपिल यांनी देखील करिअरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. त्यांनी भारताकडून १३१ कसोटी आणि २२५ वनडे सामने खेळले. कपिल यांच्या नावावर कसोटीत ४३४ तर वनडेत २५३ विकेट आहेत. कपिल यांच्याबरोबरच इंग्लंडचे याचा देखील या यादीत समावेश आहे. बॉथम यांनी १५ वर्षाच्या करिअरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. त्यांनी १०२ कसोटीत ३८३ विकेट तर ११६ वनडेत १४५ विकेट घेतल्या.
पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान आणि माजी कर्णधार यांनी पूर्ण करिअरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. इम्रान यांनी पाककडून ८८ कसोटीत ३६२ तर १७५ वनडेत १८२ विकेट घेतल्या होत्या. यादीतील अखेरचे गोलंदाज म्हणजे ऑस्ट्रेलियाचे दिग्गज गोलंदाज होय. लिली यांनी कसोटीत ३५५ तर वनडेत १०३ विकेट घेतल्या आहेत. कसोटीत सर्वात प्रथम ३५० विकेट घेणारे ते गोलंदाज होते. वेगवान गोलंदाजी ही त्याची खास शैली होती. या दिग्गज गोलंदाजाने देखील कधीच न बॉल टाकला नाही.
क्रिकेटमध्ये ज्या गोलंदाजांनी एकही नो बॉल टाकला नाही त्यामध्ये सर्वाधिक सामने कपिल देव यांनी खेळले आहेत.
वाचा-
एक ही नो बॉल न टाकलेले गोलंदाज
१] कपिल देव
२]इयान बॉथम
३]इम्रान खान
४]डेनिस लिली
५] लान्स गिब्स
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times