वाचा-
मोहम्मद अझरुद्दीनने भारताकडून खेळताना सर्वाधिक तीन वेळा वर्ल्ड कपमध्ये नेतृत्व केले आहे. क्रिकेटमधून बाहेर पडल्यानंतर अझर राजकारणात उतरला. त्यानंतर आता तो क्रिकेट एक्सपर्ट म्हणून काम करतो. सध्या तो हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष देखील आहे.
वाचा-
नुकत्याच एका मुलाखतीत अझरने सांगितले की, जर संधी मिळाली तर त्याला टीम इंडियाचा कोच होण्यास आवडले. गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, हा पदासाठी तयार आहे. जर मला संधी मिळाली तर भारतीय संघासाठी काम करेन. अशी संधी मी एका क्षणात स्विकारेन.
वाचा-
अझरने १७४ वनडे सामन्यात संघाचे नेतृत्व केले. सर्वाधिक सामन्यात भारताचे नेतृत्व करणाऱ्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या संघासोबत इतका सपोर्ट स्टाफ असतो यावर अझरने आश्चर्य व्यक्त केले. एका संघासोबत किती लोक असतात? आता माझेच उदाहरण घ्यायचे झाले तर मी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये एक्सपर्ट आहे. त्यामुळे मी मुख्य कोच झालो तर फलंदाजीसाठी कोचची गरज नाही.
आयपीएल बद्दल म्हणाला…
करोना व्हायरसमुळे आयपीएल कधी होईल याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. आयपीएल संदर्भात बोलताना अझर म्हणाला, या वर्षाच्या अखेरपर्यंत आयपीएल होऊ शकते. मला आशा आहे की आपल्याला तसा एक कालावधी मिळेल. तुम्हाला पटो वा ना पटो पण गेल्या १०-१२ वर्षात IPLने आपल्याला खुप काही दिले आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times