या ३ कारणांमुळे भारत मॅच हरला

फलंदाजीत रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी धमाकेदार सुरुवात करुन दिली होती. या जोडीने अर्धशतकी भागिदारी केल्यानंतर मात्र भारताच्या मधळ्या फळीतील फलंदाजांना चांगली धावसंख्या करता आली नाही. विराट कोहलीने अर्धशतक केले. पण त्याला कोणाची साथ मिळाली नाही. सूर्यकुमार यादव (१३ धावा), दीपक हुड्डा (१६), ऋषभ पंत (१४) धावांवर बाद झाले. त्यामुळे भारताला २०० धावसंख्येपर्यंत पोहोचता आले नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणारा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या या सामन्यातील पराभवाचा व्हिलन ठरला. आज हार्दिक शून्यावर बाद झाला. त्यानंतर गोलंदाजीत त्याने ४ ओव्हरमध्ये ४४ धावा दिल्या.
भारताचा मुख्य जलद गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ४० धावा दिल्या. पाकिस्तानला अखेरच्या १२ चेंडूत २६ धावांची गरज होती. भारताकडून १९वे षटक भुवीने टाकले. त्याच्या या ओव्हरमध्ये पाकिस्तानने १९ धावा वसुल केल्या. त्यामुळे अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी फक्त ७ धावांची गरज होती.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times