नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत म्हटले की त्याला जणू युद्धाचे स्वरुप येते. त्यात ही जेव्हा क्रिकेटची मॅच होते तेव्हा तर ज्वर अधिक असतो. पुन्हा दोन्ही देश वर्ल्ड कपमध्ये खेळणार असेल तर मग विचारण्याची सोयच नाही. वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची भारताविरुद्धची कामगिरी अजिबातच चांगली नाही. दोन्ही संघ आयसीसी वर्ल्ड कपमध्ये सात वेळा लढले आहेत. पण त्यापैकी एकाही लढतीत पाकिस्तानला विजय मिळवता आला नाही.

वाचा-
वर्ल्ड कपमध्ये आजच्या दिवशी (१६ जून २०१९) एक वर्षापूर्वी भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. इंग्लंड मध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा जबरदस्त फॉर्ममध्ये होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहितने ११३ चेंडूत धमाकेदार १४० धावा केल्या होत्या. यात १४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. वनडे करिअरमधील त्याचे हे २४वे शतक होते.

वाचा-
रोहितनंतर कर्णधार (७७) आणि केएल राहुल (५७) यांनी अर्धशतक पूर्ण केले. भारताने ५० षटकात पाकिस्तानपुढे ३३६ धावांचे टार्गेट दिले. या सामन्यात सर्वात कमी डावात ११ हजार धावा करण्याचा सचिन तेंडुलकरचा १७ वर्ष जुना विक्रम विराटने स्वत:च्या नावावर केला.

वाचा-

वाचा-
भारताने दिलेले ३३७ धावांचे विशाल लक्ष्य, टीम इंडियाची गोलंदाजी आणि मॅनचेस्टरमधील पावसाचे वातावरण यात पाकिस्तानसाठी सामना जिंकणे सोपे नव्हते. पाकिस्तानच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. विजय शंकने पाचव्या षटकात इमाम उल हकला बाद करत पहिला झटका दिला. त्यानंतर बाबर अझम आणि फकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. पण २४व्या षटकात बाबर ४८ धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला ठरावीक अंतराने झटके दिले. त्यांनी ३६ षटकात ६ बाद १६६ धावा केल्या आणि तेव्हाच पाऊस सुरू झाला. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर पाकला ४० षटकात ३०२ धावांचे आव्हान दिले. म्हणजे त्यांना ५ षटकात १३६ धावा करायच्या होत्या. भारतीय गोलंदाजांनी त्यांना २१२ धावांवर रोखले आणि ८९ धावांनी सामना जिंकला.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here