वाचा-
काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने कोणत्याही परिस्थितीत आयोजन करण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. स्पर्धा रिकाम्या मैदानात प्रेक्षकांशिवाय घ्यावी लागली तरी चालेल पण आयपीएल आयोजन करूच असे देशातील सर्व राज्यातील क्रिकेट बोर्डांना लिहलेल्या पत्रात गांगुलीने म्हटले होते. विशेष म्हणजे आजच (मंगळवारी) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यावर्षी आयसीसी टी-२० वर्ल्ड कप होणे शक्य नसल्याची कबूली दिली होती. गोष्टी खुपच अवघड आहे. १६ संघांना ऑस्ट्रेलियात आणने सोपी गोष्ट नाही. कारण अनेक देशात अद्याप करोना व्हायरस आहे असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल एडिंग्स म्हणाले.
वाचा-
मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२०चे आयोजन २६ सप्टेंबरपासून सुरू होऊ शकते. ही स्पर्धा ८ नोव्हेंबरपर्यंत होऊ शकते. ऑस्ट्रेलियात १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात वर्ल्ड कप नियोजित आहे. पण करोनामुळे ही स्पर्धा स्थगित किंवा रद्द होऊ शकते. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आयपीएलमधील अधिकतर सामने दक्षिण भारतात होऊ शकतात. कारण त्या भागात मान्सून अधिक सक्रिय नसेल.
वाचा-
अशा परिस्थितीत चेन्नई आणि बेंगळुरू या दोन शहरात मोठी स्पर्धा असेल. आयपीएलच्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यासाठी बीसीसीआयची पहिली पसंद मुंबई होती. पण मुंबईत करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे परिस्थितीत सुधारणा झाली तर काही सामने मुंबई होतील, असे बीसीसीआयचे नियोजन आहे.
वाचा-
मुंबईत चार आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहेत. येथे स्टेडियमच्या जवळ हॉटेल आहेत येथे खेळाडू थांबू शकतील. पण करोनामुळे आयपीएल आयोजक निराश झालेत. आता कर्नाटक आणि तामिळनाडूमधील केपीएल आणि टीएनपीएलसाठीच्या मैदानात आयपीएलचे सामने होऊ शकतात.
रिपोर्टनुसार बीसीसीआयने अधिकृतपणे याची माहिती दिली नाही. तसेच स्पर्धेतील ८ संघांना याबद्दल अद्याप सांगितले गेले नाही. या सर्व नियोजनावर अद्याप चर्चा सुरू असल्याचे समजते. अर्थात सप्टेंबर महिन्यात आशिया कप देखील आहे. पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे यावेळी होणारी स्पर्धा ही छोटीच असेल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times