नवी दिल्ली: विश्वातील सर्वात महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मैदानावर कधी रागावलेले पाहिले आहे का? सचिनच्या २४ वर्षाच्या करिअरमध्ये असे कधीच पाहायला मिळाले नाही. अगदी अंपायरने चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यावर देखील सचिनने कधी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. क्रिकेटमधील सभ्यपणा सचिनने नेहमीच जपला. पण सचिनचा पुत्र अर्जून मात्र असा नाही. अर्जुनला राग येत आणि ते येणे थोडेफार नैसर्गिक आहे. कारण अर्जुन एक वेगवान गोलंदाज असून अशा गोलंदाजांच्या स्वभावातच राग असतो.

वाचा-
सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केले आहेत. आता अर्जुन देखील क्रिकेटच्या मैदानावर उतरला असून सर्वांचे लक्ष्य त्याच्या कामगिरीवर असते. इंग्लंडच्या महिला संघातील सलामीवीर डेनियल वेटने एका मुलाखतीत सांगितले की, अर्जुनने तिच्या डोक्यावर बाउंसर चेंडू टाकण्याचा इशारा दिला आहे.

वाचा-
डेनियल वेडने क्रिकेट.कॉम या न्यूज वेबसाइटला नुकतीच एक मुलाखत दिली. यात अर्जुन तेंडुलकरच्या जलद गोलंदाजीबद्दल बोलताना ती म्हणाली, अर्जुनच्या चेंडूवर फलंदाजी करणे दिवसे दिवस अवघड होत चालले आहे. त्याच्या गोलंदाजीची धार आणि वेग वाढत आहे.

वाचा-
सचिन आणि त्याचे कुटुंबीय जेव्हा इंग्लंडला येतात तेव्हा अर्जुन लॉर्ड्सवर सराव करण्यासाठी येतो. तो सराव सत्रात मला गोलंदाजी करतो. गेल्या काही काळात त्याच्या गोलंदाजीचा वेग वाढला आहे. तो मला नेहमी इशारा देतो की, मी बाउंसर चेंडू टाकेन आणि तुमच्या डोक्यावर मारेन. त्यामुळेच मला आता वाटेत की, अर्जुनने गोलंदाजी करू नये. त्याच्या गोलंदाजीला सामोरे जाणे हे धोकादायक ठरत आहे, असे डेनियल म्हणाली.

वाचा-
सचिनचे कुटुंब खुप प्रेमळ आहे. अर्जुनची आई अंजली प्रेमळ असल्याचे डेनियलने सांगितले. डेनियल आणि सचिनची भेट यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप दरम्यान झाली होती. डेनियलने इंग्लंडकडून आतापर्यंत ७४ वनडे आणि १०९ टी-२० सामने खेळले आहेत.

वाचा-
आणि हे दोघे खुप चांगले मित्र आहेत. सचिन आणि परिवार प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीच दोन महिन्यांसाठी इंग्लंडला येतात. तेव्हा डेनियल आणि अर्जुन नेटमध्ये सराव करतात. अर्जुनने नेट सरावात यॉर्करने इंग्लंडचा सलामीचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला जखमी केले आहे. अर्जुनने टाकलेला चेंडू लागल्यामुळे बेअरस्टोला सराव सोडावा लागला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here