लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे ४३ सैनिक जखमी झालेत. या झटापटीत १७ भारतीय जवान शहीद झाल्याचे लष्कराने काल रात्री उशिरा सांगितले. या घटनेवर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय खेळाडूंनी देखील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण आपल्या प्रतिक्रिया देत असताना आयपीएलमधील एका व्यक्तीचा तोल गेला. त्याच्याकडून एक वादग्रस्त ट्विट पाहायला मिळाले. त्यानंतर त्याच्यावर संघाकडून हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे.
आयपीएलमध्ये प्रसिद्ध असलेल्या चेन्नई सपर किंग्स या संघातील ही व्यक्ती आहे. महेंद्रसिंग धोनीसारखा शांत कर्णधार या संघाला लाभला आहे. पण तरीही संघातील व्यक्तीकडून एक वादग्रस्त ट्विट पाहायला मिळाले आणि त्यानंतर त्याची हकालपट्टी करण्यात आली.
भारताचे २० जवान शहीद झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यानंतर लोकांनी याबाबत शोक व्यक्त केला. चेन्नईच्या संघाचे डॉक्टर असलेले मधू थोटाप्पिलील यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, ” भारताचे जे जवान शहीद झाले, त्यांच्या शव पेटींनी पीएम केअर्सचे स्टीकर्स लावले जात आहेत का?” या वादग्रस्त ट्विटनंतर चेन्नईच्या संघाने मधू यांची हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या या ट्विटशी चेन्नई सुपर किंग्स या संघाचा कोणताही संबंध नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.
चेन्नई सुपर किंग्स या संघाने ट्विट करत सांगितले आहे की, ” मधू यांनी केलेल्या ट्विटचा आमच्याशी काहीही संबंध नाही. संघ व्यवस्थापनाला न विचारता त्यांनी या गंभीर गोष्टीवर ट्विट केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांची हकालपट्टी करत आहोत. या ट्विटबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.”
मधू यांचे ट्विट वादग्रस्त होते. त्यामुळे कदाचित चेन्नईच्या संघावरील विपरीत परीणाम होऊ शकता असता. पण वेळच चेन्नईच्या संघाने या गोष्टीवर आपले मत व्यक्त करत मधू यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण जास्त चिघळणार नसल्याचे पाहायला मिळत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times