लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० झाले तर चीनचे ४३ सैनिक जखमी झालेत. या झटापटीत १७ भारतीय जवान शहीद झाल्याचे लष्कराने काल रात्री उशिरा सांगितले. या घटनेवर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय खेळाडूंनी देखील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी भारताच्या एका खेळाडूने एक धक्कादायक आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण त्याने चीनवर भारतीय खेळाडूंची सुनियोजित हत्या केल्याचे म्हटले आहे.
चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले. या गोष्टीचे सर्वच भारतीयांना दु:ख आहे. या घटनेनंतर भारतीय खेळाडूंनीही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण ही श्रद्धांजली वाहत असताना भारताच्या एका दिग्गज खेळाडूने असे काही वक्तव्य केले आहे की, त्यामुळे आता नवीन वाद निर्माण होऊ शकतो.
काय आहे हा आरोपलडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर भारताचा माजी दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतियाने एक गंभीर आरोप केला आहे. याबाबत बायचुंग म्हणाला की, ” चीनने काही आठवड्यांपूर्वीच आपल्या नागरिकांना भारत सोडायला सांगितले होते. त्यानंतर चीनने हल्ला केला आणि त्यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. माझ्यामते ही चीनने भारतीय जवानांची केलेली सुनियोजित हत्या आहे. याबाबत भारत सरकारने कठोर पावले उचलायला हवीत.”
बायचुंगने आता एक गंभीर बाब भारतीय सरकरापुढे आणली आहे. त्यामुळे आता या गोष्टीवर भारत सरकरा नेमका काय विचार करते आणि कोणते पाऊल उचलते, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. पण भारत सरकारने दखल घ्यावी असे बायचुंगचे आरोप असल्याचे चाहत्यांना वाटत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times