कोलकाता: चित्रपट अभिनेता सुशांत सिंह रजपूतने आत्महत्या केल्याच्या घटनेला चार दिवस झाले नसताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही धक्कादायक बातमी एका क्रिकेटपटूच्या आत्महत्येची आहे. त्रिपूराच्या १९ वर्षाखालील महिला संघाकडून खेळणाऱ्या एका खेळाडूने आत्महत्या केली.

वाचा-
त्रिपुरा क्रिकेट संघातील खेळाडू मृत अवस्थेत तिच्या घरी आढळली. येथील स्थानिक वृत्तपत्र Syandanने दिलेल्या माहितीनुसार १६ वर्षीय अयंतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री तिने आत्महत्या केल्याचे समोर आले.

अयंतीच्या आत्महत्येसंदर्भात अद्याप अधिकृतपणे कोणीही बोलले नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारण देखील समजले नाही.

वाचा-
चार भावांडांमध्ये सर्वात लहान असलेली अयंती गेल्या एक वर्षापासून त्रिपूराच्या १९ वर्षाखालील संघातून खेळत होती. तिने राज्यस्तरीय २३ वर्षाखालील टी-२० स्पर्धेत भाग घेतला होता.

रेआंग या आदिवासी जमाती जन्मलेल्या अयंतीने राज्य क्रिकेट स्तरापर्यंत झेप घेतली होती. ती अगरतळापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या उदयपूर येथील रहिवासी होती.

वाचा-
अयंतीच्या निधनाचे वृत्त समजल्याने धक्काच बसला असून आम्ही एक चांगली युवा क्रिकेटपटू गमावली, अशी प्रतिक्रिया क्रिकेट असोसिएशनच्या सचिव तैमीर चंदा यांनी दिली. अयंती कोणत्या तणावात होती का अशी विचारणा केली असता चंदा म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी ती राज्य क्रिकेट संघासोबत होती. ती १६ दिवस आमच्या सोबत होती आणि अगदी आनंदी होती. लॉकडाऊनमुळे आम्ही सर्व जण एकत्रच होतो. त्यानंतर आम्ही काही ऑनलाइन कोर्स देखील घेतले होते. पण तिच्या कौटुंबीक अडचणींबद्दल काही कल्पना नसल्याचे चंदा म्हणाल्या.

हे देखील वाचा-

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here