लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे ४३ सैनिक जखमी झालेत. या झटापटीत १७ भारतीय जवान शहीद झाल्याचे लष्कराने काल रात्री उशिरा सांगितले. या घटनेवर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय खेळाडूंनी देखील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण ही श्रद्धांजली वाहत असताना भारताच्या एका दिग्गज खेळाडूने चीनला आपली जागा कशी दाखवता येऊ शकेल, याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत.
चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले. या गोष्टीचे सर्वच भारतीयांना दु:ख आहे. या घटनेनंतर भारतीय खेळाडूंनीही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. पण आता चीनबरोबर आपण नेमके काय करायला हवे, आपण चकसे वागायला हवे आणि कोणत्या गोष्टी करायल्या हव्यात, याबाबत भारताच्या महान खेळाडूने आपले मत व्यक्त केले आहे.
भारताला आतापर्यंत सर्वाधिक ऑलिम्पिक पदके जिंकवून देणारा महान कुस्तीपटू सुशील कुमारने शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याचबरोबर चीनला ताळ्यावर कसे आणायचे हेदेखील सांगितले आहे. याबाबत सुशील म्हणाला की, ” चीनने केलेल्या हल्ल्यात आपल्या २० जवानांना शहीद व्हावे लागले. सर्व प्रथम या सर्व शहीद जवानांना मी श्रद्धांजली वाहतो. त्याचबरोबर देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या जवानांना सलाम ठोकतो.”
सुशील पुढे म्हणाला की, ” जेव्हा संपूर्ण जग करोनाबरोबर लढतं आहे, त्यावेळी चीन ही गोष्ट करताना दिसत आहे. माझ्यामते चीनबरोबर आपण चांगले संबंध ठेवू नयेत, त्याचबरोबर चीनच्या प्रत्येक वस्तूंवर आपण बहिष्कार घालायला हवा. त्याचबरोबर भारत सरकारने एक गोष्ट करायला हवी. भारत सरकारने चीनच्या वस्तू भारतामध्ये कशा येणार नाहीत, याची एक योजना बनवायला हवी. त्याचबरोबर भारतामध्ये ज्या चीनच्या वस्तू आहेत त्यांचे काय करायचे, याचादेखील सरकारने लवकर निर्णय घ्यावा.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times