भारतीय जवान शहीद झाल्यावर बरेच जण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. कारण आपल्या देशाचे रक्षण करताना जवानांनी दिलेली ही आपल्या प्राणांची आहुती सर्वांसाठी मोलाची ठरत आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी चीनच्या लष्करासोबत झालेल्या धुमश्चक्रीत २० भारतीय जवान शहीद झाले तर चीनचे ४३ सैनिक जखमी झालेत. या झटापटीत १७ भारतीय जवान शहीद झाल्याचे लष्कराने काल रात्री उशिरा सांगितले. या घटनेवर संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
कुंदन शहीद झाल्यावर त्यांच्या वडिलांची एक प्रतिक्रीया घेण्यात आली होती. यामध्ये त्यांनी सांगितले की, ” माझ्या मुलाने देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. मला दोन नातू आहेत आणि त्यांनाही मी भारतीय सैन्यामध्ये पाठवणार आहे.” आपला मुलगा शहीद झाल्यावरही त्याच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया ही भावूक होती. यानंतर सेहवाग म्हणाला की, ” ही इश्वराच्या रुपातील माणसं आहेत. चीनला आम्ही लगेच आरसा दाखवू.”
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणही यावेळी जवान शहीद झाल्यावर भावूक झालेला पाहायला मिळाला आणि त्याने एका ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इरफान म्हणाला की, ” काही वेळेला सीमेवर आपल्या जवानांना शहीद व्हावे लागते. माझी अशी इच्छा आहे आणि मी त्यासाठी प्रार्थना करतो की, यावर एक मार्ग असा काढायला हवा, जेणेकरून एका आईला आपला मुलगा गमावल्याचे दु:ख होणार नाही. कोणत्याही पित्याला आपला वंश गमवावा लागू नये. एका भावाला आपला मित्र गमवावा लागू नये आणि एका बहिणीला एक हात गमवावा लागू नये ज्यावर ती राखी बांधते.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times