नवी दिल्ली: १८ जून १९८३ ही तारीख भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात खास अशी आहे. इंग्लंडच्या ट्रेंटब्रिज वेल्स मैदानावर वर्ल्ड कप स्पर्धेतील एक महत्त्वाची लढत सुरू होती. क्रिकेटच्या मैदानावर त्या दिवशी जे झाले ते शानदार असे होते आणि तो क्षण पुन्हा कोणालाच अनुभवता येणार नाही असा ठरला. त्या दिवशी मैदानावर जे लोक उपस्थित होते ते सर्व जण आज ही स्वत:ला लकी मानतात. त्यांनी जे पाहिले ते इतर कोणाला पाहता आले नाही कारण या सामन्याचे रेकॉर्डिंग झाले नाही. बीसीसीचा संप आणि मैदानात कोणाकडेच कॅमेरा नसल्याने क्रिकेट इतिहासातील सर्वात शानदार खेळी रेकॉर्ड झाली नाही. ही खेळी फक्त स्कोअरबुकमध्ये पाहता येते.

वाचा-
आजपासून ३७ वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा कर्णधार कपिल देवने वनडे क्रिकेटमध्ये अशी फलंदाजी केली ज्याची आठवण आज देखील सर्व जण करतात. झिम्बाब्वे त्यांचा पहिला वर्ल्ड कप खेळत होती आणि सेमीफायनल सामन्यात त्यांनी भारताला अडचणीत आणले होते. फक्त ९ धावांवर भारताचे ४ फलंदाज बाद झाले. तेव्हा मैदानात उतरले कर्णधार निखंज. १७ धावांवर भारताची पाचवी विकेट पडली. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा सामना करणे अवघड होते. पण कपिल देव यांच्या खेळीने सामन्याचे चित्रच बदलले.

वाचा-

तेव्हा वनडेत ६० षटकांचा सामना व्हायचा. भारताने ८ बाद २६६ धावा केल्या. यात कपिल देवच्या नाबाद १७५ धावा होत्या. भारतीय क्रिकेट संघाकडून आंतरारष्ट्रीय स्तरावरील हे पहिले शतक होते, ही गोष्टी फार कमी जणांना माहित आहे. सुनिल गावसकर यांच्या मते वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजांकडून झालेल्या शतकांपैकी कपिल देव यांचे शतक सर्वोत्तम होते. मी जितक्या वनडे खेळी पाहिल्या आहेत. त्यापैकी ही सर्वोत्तम आहे आणि मी खुप प्रमाणात वनडे सामने पाहिले आहेत.

वाचा-
कपिल देव यांच्या या ऐतिहासिक खेळीत सैयद किरमानी यांची मोलाची साथ मिळाली. किरमानी यांनी २४ धावा केल्या. या दोघांनी ९व्या विकेटसाठी विक्रमी भागादीरी केली होती. कपिल देव यांनी ४९व्या षटकात शतक केले आणि पुढच्या ११ षटकात त्यांनी ७५ धावा केल्या होत्या.

कपिल देव यांच्या या खेळीमुळे भारत फक्त अंतिम फेरीत पोहोचला नाही तर संघात एक वेगळा आत्मविश्वास निर्माण झाला. कपिल जेव्हा मैदानात आले तेव्हा त्यांनी सुरुवातीला हवेत शॉट खेळले नाही. चेंडूवर नजर स्थिर झाल्यानंतर आक्रमक शॉट खेळले. कपिल देवने १३८ चेंडूत १६ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद १७५ धावा केल्या. या खेळीत त्यांचा स्ट्राइक रेट होता १२६.८१ इतका.

उत्तरादाखल झिम्बब्वेला २३५ धावा करता आल्या. भारताकडून मदन लाल यांनी सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. बिन्नी यांनी २ तर कपिल, अमरनाथ, सिंद्धू यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. त्यानंतर भारतीय संघाने अंतिम फेरीत वेस्ट इंडिजचा धक्कादायक पराभव करत पहिले विजेतेपद मिळवले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here