वाचा-
भारतीय क्रिकेट संघातील अनेक क्रिकेटपटूनी सुशांतच्या निधनावर शोक व्यक्त केला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सुशांतच्या अभिनयाने प्रभावित केले होते.
वाचा-
xtratime या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतला भारताचा दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीच्या बायोपिकमध्ये काम करायची इच्छा होती.
सुशांत आणि सौरव गांगुलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात हे दोघे एकत्र दिसत आहेत. सुशांतने गांगुलीसोबतचा हा फोटो २०१८ मध्ये शेअर केला होता. धोनीच्या बायोपिकमधील सुशांतच्या कामाचे कौतुक गांगुलीने केले होते. या दोघांची कोलकातामध्ये भेट झाली होती. तेव्हा क्रिकेटबद्दल चर्चा झाली.
वाचा-
सुशांतच्या निधनावर धोनीची कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्याच्या निधनाने धोनीला मोठा शॉक बसला होता. धोनीचे मॅनेजर आणि एम.एस धोनीच्या बायोपिकचे निर्माते अरुण पांडे यांनी सांगितले की, जेव्हा धोनीला सुशांतच्या निधनाची बातमी कळाली तेव्हा तो खुप निराश झाला.
बायोपिकची () तयारी करण्यासाठी सुशांतने धोनीसोबत बराच वेळ घालवला होता. या चित्रपटासाठी सुशांतला क्रिकेटपटू म्हणून तयार करण्याची जबाबदारी माजी क्रिकेटपटू किरण मोरे यांच्यावर होती. मुंबईतील वांद्रे-कुर्ला येथील अकादमीत सुशांतने क्रिकेटचा सराव केला होता.
वाचा-
सुशांत स्वत: क्रिकेट खेळत होता. त्यामुळे त्याला धोनीचा बायोपिक करताना फार अवघड गेले नाही. विशेष म्हणजे सुशांतने ज्या बॉलिवडू चित्रपटातून पदार्पण केले. त्या चित्रपटाचा विषय क्रिकेटवर आधारित होता. काय पो छे या चित्रपटात सुशांतने एका क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका केली होती. या चित्रटात त्याने ज्या अली नावाच्या मुलाला क्रिकेट प्रशिक्षण दिले होते. तो आता एक जलद गोलंदाज असून महाराष्ट्र संघाकडून खेळतो. आयपीएल २०२० च्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने २० लाख रुपयांची बोली लावून दिग्विजयला (Digvijay Deshmukh) करारबद्ध केले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times