भारताने २०११ साली जो विश्वचषक जिंकला, त्यावेळी अंतिम सामन्यात फिक्सिंग झाल्याचा धक्कादायक आरोप श्रीलंकेच्या माजी क्रीडा मंत्र्यांनी केला होता. या आरोपानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने मौन सोडले असून आपले मत यावेळी व्यक्त केले आहे.

जेव्हा हा विश्वचषक खेळवण्यात आला होता तेव्हा महिंदनंदा अलूठगमगे हे श्रीलंकेचे क्रीडा मंत्री होते. आता त्यांनी हा विश्वचषक फिक्स असल्याचा आरोप केला आहे. पण या आरोपानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने आता आपले मौन सोडले आहे आणि त्यांच्या या आरोपाला उत्तर दिले आहे.

संगकारा यावेळी म्हणाला की, ” विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मॅच फिक्सिंग झाली असेल तर त्याचे पुरावे त्यांनी आयसीसीला द्यावेत. त्याचबरोबर आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी खात्याकडेही त्यांनी हे पुरावे सुपूर्द करावेत, जेणेकरून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.”

हे आरोप नेमके कशासाठी…विश्वचषक २०११ साली झाला, आता त्याबद्दलचे आरोप करण्यात अर्थ नाही. पण हे आरोप का केले जात आहेत, हे श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने सांगितले आहे. याबाबत जयवर्धने म्हणाला की, ” निवडणूका जवळ येत आहेत, असं वाटत आहे. कारण हे आरोप, पुरावे… असं सर्व सुरु झालं आहे.”

भारताने २०११ साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर मात करत विश्वचषक उंचावला होता. पण या अंतिम फेरीत मॅच फिक्सिंग करण्यात आली होती, असा धक्कादायक आरोप आता श्रीलंकेच्या माजी क्रीडा मंत्र्यांनीच केला आहे. भारताने १९८३ सालानंतर २०११मध्ये विश्वचषक जिंकला होता. २०११ साली झालेल्या विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्डेडियमवर झाला होता. या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. पण हा अंतिम सामना फिक्स करण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे.

भारताने जेव्हा २०११ साली विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी श्रीलंकेचे क्रीडा मंत्री महिंदनंदा अलूठगमगे होते. महिंदनंदा यांनीच भारताने विश्वचषक जिंकला तेव्हाचा अंतिम सामना फिक्स करण्यात आलेला होता, असे सांगितले आहे. ‘न्यूज फर्स्ट’ला मुलाखत देताना महिंदनंदा यांनी सांगितले की, ” विश्वचषकातील अंतिम सामना हा फिक्स करण्यात आला होता, हे यापूर्वीही मी सांगितले आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आणि जर कोणाला याबाबत वाद विवाद करायचा असेल तर त्यासाठी मी सज्ज आहे. मी यामध्ये खेळाडूंना सहभागी करणार नाही, पण काही समूहांनी मिळून हा सामना फिक्स केला होता.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here