भारताचा कर्णधार विराट कोहली हा जगभरातील क्रिकेटपटूंमध्ये सर्वात फिट असल्याचे बोलले जाते. सध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे जवळपास तीन महिने कोहली आपल्या घरीच बसून आहे. त्यानंतर कोहली आता म्हातारा झाला आहे, असा शाब्दिक हल्ला एका ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने केल्याचे पाहायला मिळाले आहे.

करोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला क्रिकेट ठप्प पडलेले आहे. त्याचबरोबर खेळाडू सराव करण्यासाठीही मार्च महिन्यानंतर उतरलेले पाहायला मिळालेले नाहीत. मार्चपासून खेळाडू आपल्या घरातच आहेत. त्यामुळे ते यापुढेही आपला फिटनेस कायम राखू शकतात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण सध्याच्या घडीला क्रिकेटपटू पूर्वीसारखा व्यायाम करत नसणार, त्यामुळे ते फिटनेस कसा काय राखू शकणार, हा महत्वाचा मुद्दा आहे.

सध्याच्या घडीला विराटही आपल्या घरात तीन महिन्यांपासून आहे. विराटने अजून क्रिकेटच्या सरावाला सुरुवात केलेली नाही. विराट काही दिवसांच्या अंतराने सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोहलीने आजही एक सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यानंतर विराट हा म्हातारा झाल्याचे एका ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूने म्हटले आहे.

विराटने आज जी पोस्ट केली आहे, त्यामध्ये तो एक पुस्तक वाटत असल्याचे दिसत आहे. या पोस्टखाली विराटने म्हटले आहे की, ” सध्याच्या घडीला मी मुंबईमध्ये आहे आणि येथील मान्सूनचा आनंद मी घेत आहे. यापेक्षा चांगला वेळ वाचनासाठी मिळणार नाही.”

विराटच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा सलमीवीर डेव्हिड वॉर्नरने एक कमेंट केली आहे. वॉर्नरचे लक्ष या फोटोमधील विराटच्या दाढीकडे गेले आहे. विराटच्या दाढीमध्ये काही पांढरे केस त्याला दिसले आणि त्यानंतर त्याने एक कमेंट केली आहे. वॉर्नरने म्हटले आहे की, माझ्या युवा मित्राच्या दाढीत काही पांढरे केसही पाहायला मिळत आहेत. या कमेंटनंतर वॉर्नरने काही इमोजींचाही वापर केला आहे. वॉर्नरची ही कमेंट चांगली व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चाहत्यांनीही वॉर्नरच्या कमेंटवर आपले मत व्यक्त केले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here