वाचा-
नॉटिंगम येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने ५० षटकात ४८१ धावांचा डोंगर उभा केला. त्याआधी वनडेमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम त्यांनीच ३० ऑगस्ट २०१६ रोजी पाकिस्तानविरुद्ध याच मैदानावर केला होता. पाक विरुद्ध त्यांनी ३ बाद ४४४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अॅलेक्स हेल्सने ९२ चेंडूत १६ चौकार आणि ५ षटकारांसह १४७ धावा केल्या. जर जॉनी बेयरस्टोने ९२ चेंडूत १५ चौकार आणि ५ षटकारांसह १३९ धावांचा पाऊस पाडला. बेअरस्टोने जेसन रॉयसह पहिल्या विकेटसाठी ११७ चेंडूत १५९ धावा केल्या. त्यानंतर हेल्ससह दुसऱ्या विकेटसाठी फक्त ८८ चेंडूत १५१ धावा जोडल्या.
पाहा-
इंग्लंडने ३५ षटकात ३१० धावांपर्यंत मजल मारली होती. जोस बटलर स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार इयॉन मोर्गनने ३० चेंडूत ६७ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून अॅड्यू टायने ९ षटकात १०० धावा दिल्या तर तीन विकेट घेणाऱ्या रिचर्ड्सनने १० षटकात ९२ धावा दिल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्टन अॅगरने सर्वात कमी म्हणजे १० षटकात ७० धावा दिल्या होत्या.
वाचा-
या सामन्यात मोर्गनने इंग्लंडकडून सर्वात वेगवान अर्धशतक केले. त्याने फक्त २१ चेंडूत ५० धावा केल्या. त्याआधी बटलरने पाकिस्तानविरुद्ध २०१६ मध्ये २२ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. क्रिकेटच्या इतिहासात पुरुष संघाकडून झालेली ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
पुरुष वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावासंख्या
> इंग्लंड- ६ बाद ४८१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया
> इंग्लंड- ३ बाद ४४४ विरुद्ध पाकिस्तान
> श्रीलंका- ९ बाद ४४३ विरुद्ध नेदरलँड
> दक्षिण आफ्रिका- २ बाद ४३९ विरुद्ध वेस्ट इंडिज
भारताच्या पुरुष संघाचा विचार केल्यास त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ५ बाद ४१८ ही सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
महिला संघाने केल्या आहेत पुरुषांपेक्षा अधिक धावा
वनडे क्रिकेटमध्ये इंग्लंडने ४८१ धावा केल्या. त्यांना ५०० ही धावसंख्या गाठण्यासाठी फक्त १८ धावा कमी पडल्या. पण न्यूझीलंडच्या महिला संघाने वनडेत आयर्लंडविरुद्ध ४९१ धावा केल्यात.
महिला वनडेमधील सर्वोच्च धावा
> ४९१- विरुद्ध आयर्लंड
> ४५५- विरुद्ध पाकिस्तान
> ४४०- विरुद्ध आयर्लंड
> ४१८ विरुद्ध आयर्लंड
भारतीय महिला संघाने वनडेत आयर्लंड विरुद्ध २ बाद ३५८ अशी सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times