रशिदने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, You were my home my mother I had no home but you . i can’t believe you are no more with me you will missed forever . Rest In Peace
गेल्या अनेक वर्षांपासून स्वत:चे घर सोडून एका निर्वासित कॅम्पमध्ये राहत आहे. त्यामुळेच त्याने लिहलेल्या भावनिक मेसेजमध्ये माझ्याकडे घर नाही आणि तुच माझे घर होतीस, असे म्हटले.
सोशल मीडियावर क्रिकेट चाहते राशिदचे सात्वन करत आहेत. २०१८ साली रशिदच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हा तो ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धेत खेळत होता.
२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपनंतर अफगाणिस्तानच्या तिनही प्रकारच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपवण्यात आले होते. रशिदने आतापर्यंत ४ कसोटी, ७१ वनडे आणि ४८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले असून त्यात अनुक्रमे २३,१३३ आणि ८९ विकेट घेतल्या आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये रशिदने ३ वेळा केली आहे. अशी कामगिरी करणारा तो फक्त पाचवा गोलंदाज आहे. त्याने २०१७ मध्ये कॅरेबियन प्रिमिअर लीग स्पर्धात सर्व प्रथम हॅटट्रिक घेतली होती. त्यानंतर बिग बॅश ली मध्ये रशिदने पुन्हा अशी कामगिरी केली. आयपीएलमध्ये रशिद खान सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये ४६ सामन्यात ५५ विकेट घेतल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या स्थानावर श्रीलंकेच्या लसिथ मलिंगा आहे. त्याने १०७ विकेट घेतल्या आहेत.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times