सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रेग्नेंट असल्याचे दिसत आहे. नेमकी गोष्ट आहे तरी काय, जाणून घ्या फॅक्ट चेक…

विराट आणि अनुष्का यांची एका जाहीरातीदरम्यान ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विराट आणि अनुष्का यांचा विवाह सोहळा इटलीमध्ये ११ डिसेंबर २०१७ या दिवशी झाला होता. त्यानंतर विराट आणि अनुष्का बऱ्याचदा एकत्र पाहायला मिळाले.

लग्न झाल्यावर अनुष्का ही विराटबरोबर परदेश दौऱ्यावर जातानाही आपण पाहिले आहे. पण विराटसाठी अनुष्का लकी नसल्याचे बऱ्याचदा चाहत्यांनी म्हटले होते. ही चर्चा बराच काळ रंगली होती. पण कालांतराने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. आता अनुष्का ही प्रेग्नेंट असून विराटच्या घरी आता पाळणार हलणार असल्याची बातमी चांगलीच व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. ही बातमी फक्त व्हायरल झालेली नाही तर अनुष्का आणि विराट या दोघांचे खास फोटोही यावेळी पाहायला मिळत आहेत.

विराट आणि अनुष्का यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये अनुष्का ही प्रेग्नेंट असून विराट तिची काळजी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर या गूड न्यूजमुळे हे दोघेही आनंदीत असल्याचे दिसत आहेत. विराट आणि अनुष्काच्या घरी कधी पाळणार हलणार, याची उत्सुकता चाहत्यांना होता. हा फोटो चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

अनुष्का प्रेग्नेंट असल्याचा फोटो तुम्ही पाहिला असेल, पण ही गोष्ट खरी आहे की नाही याचा छडा लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमने केला आहे. या फोटोबाबत फॅक्ट चेक करत असताना एक गोष्ट पुढे आली आहे. ही गोष्ट म्हणजे हा फोटो विराट आणि अनुष्काचा नसून सोशल मीडियावर या फोटोबाबत छेडछाड करण्यात आली आहे. कारण हा फोटो बॉलीवूडमधील एका कपलचा असल्याचे पुढे आले आहे.

हा मूळ फोटो बॉलीवूड स्टार रितेश देशमुख आणि त्याच्या पत्नीचा आहे. या फोटोवर छेडछाड करून विराट आणि अनुष्काचे चेहरे लावण्याचा खोडसाळपणा कोणीतरी केलेला दिसत आहे.

(अनुष्का शर्मा प्रेग्नेंट होत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. या फोटोची शहानिशा केल्यावर सोशल मीडियावर मूळ फोटोवर छेडछाड करत विराट आणि अनुष्का यांचे चेहरे लावण्यात आले आहेत. या फोटोंची जबाबदारी महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम घेत नाही.)

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here