रस्त्यांवर किती खड्डे असतात, हे आपल्या सर्वांनाच परिचयाचे आहे. रस्त्यात खड्डे असतात की खड्ड्यात रस्ते, असा प्रश्नही काही वेळेला लोकांना पडतो. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे १६ वर्षांचा एकुलता एक मुलगा गमावण्याची वेळ एका वडिलांवर आल्याचे पाहायला मिळत आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे आपल्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी एक काम हाती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने याबाबत एक ट्विट केले असून ते चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.

मुंबईतील खड्ड्यांमुळे एका वडिलांवर आपला मुलगा गमावण्याची वेळ आली. एकुलता एक मुलगा गमावल्यामुळे त्याच्या वडिलांना धक्का बसला आहे. पण या धक्क्यातून ते आता सावरत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारम मुलगा गमावल्यावर ते एक काम करताना पाहायला मिळत आहेत.

कोण आहे ही व्यक्ती आणि ते काय करतात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे १६ वर्षांचा एकुलता एक मुलगा गमावण्याची वेळ मुंबईतील दादाराव बिलहोरे यांच्यावर आली आहे. पण या धक्क्यातून ते आता सावरले आहे. पण आपल्यावर जी वेळ आली ती कोणावर येऊ नये, असे त्यांनी ठरवले आहे. त्यासाठी दादाराव आता रस्त्यांतील खड्डे बुजवण्याचे काम करताना पाहायला मिळत आहेत.

भारतीय खेळाडूचे ट्विट व्हायरलदादाराव आता रस्त्यांतील खड्डे बुजवण्याचे काम असल्याचे फोटो भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणला मिळाले आणि त्याने हे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या फोटोंबरोबर लक्ष्मणने लिहिले आहे की, ” रस्ते अपघातात दादाराव बिलहोरे यांना आपला १६ वर्षांचा मुलगा गमवावा लागला आहे. त्यामुळे आता ते रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम करताना दिसत आहे. दादाराव सर्व साहित्य घेऊन रस्त्यावर उतरतात आणि खड्डे बुजवण्याचे काम करत आहेत. दादाराव जे करत आहे, त्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.”

लक्ष्मणचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. या ट्विटमुळे लोकांनी काही प्रतिक्रिया देत, सरकारने आता तरी जागे व्हावे, असे म्हटले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here