भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या घरात करोना व्हायरस पोहोचला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गोष्टीमुळे आता बऱ्याच जणांना धक्का बसला असून हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहे. सौरवच्या कुटुंबियांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सौरवचा मोठा भाऊ स्नेहाशिष हा बंगाल क्रिकेट असोसिएशनमध्ये सचिव आहे. त्याच्या पत्नीसहती सासु आणि सासऱ्यांना करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीलाही करोनाची बाधा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर स्नेहाशिष यांचीही करोना चाचणी घेण्यात आली, पण त्यांना करोना झाला नसल्याचे पाहायला मिळाले आहे. स्नेहाशिष हे माजी रणजीपटूही आहेत. स्नेहाशिष यांच्याकडून सौरवने क्रिकेटचे धडले गिरवायला सुरुवात केल्याचे म्हटले जाते.

मोमिनपूर येथील एका खासगी रुग्णालयात या सर्वांवर उपचार सुरु आहेत. या सर्वांची शनिवारी अजून एक चाचणी घेण्यात येणार आहे. सध्या या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ” जेव्हा या चारही व्यक्तींना समस्या जाणवायला लागली तेव्हा आम्ही त्यांची करोना चाचणी घेतली आणि त्यांची ही चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे आता त्यांच्यावर आम्ही उपचार करत आहोत.”

लॉकडाऊनच्या काळात सौरव गांगुली २० हजार गरजू लोकांच्या मदतीसाठी धावून आला होता. यापूर्वी गांगुलीने २ हजार किलो तांदुळ एका संस्थेला दान केला होता. त्यानंतर आता गांगुली पुन्हा एकदा २० हजार लोकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावला. ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्येही अम्फान या चक्रीवादळाने थैमान घातले होते. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. सर्व सामान्य माणसं हताश झाली होती. या लोकांना मदत करण्यासाठी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू आणि सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष असलेला सौरव गांगुली धावून आल्याचे पाहायला मिळाले होते. गांगुली यांनी तब्बल १० हजार कुटुंबियांना यावेळी मदत केल्याचे पाहायला मिळत आहे. गांगुलीने प्रत्येक संकटांमध्ये लोकांसाठी चांगले काम केल्याचे पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here