सध्याच्या घडीला सानिया आणि तिचा मुलगा हे दोघेही भारतामध्येच आहेत. करोना व्हायरसच्या या काळात आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांमध्ये शोएबने सानिया आणि आपल्या मुलाची भेट घेतलेली नाही. त्यामुळे आधी पत्नी आणि मुलाची भेट घेतल्यानंतरच तो इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.
पाकिस्तानचा २९ खेळाडूंचा संघ हा २८ जूनला इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पण शोएब मात्र या संघाबरोबर इंग्लंडला जाणार नाही. शोएब या दौऱ्याच्या पूर्वी पत्नी सानियाला भेटणार आहे आणि पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने त्याला परवानगीही दिली आहे. त्यामुळे आता शोएब २४ जुलैला पाकिस्तानच्या संघाला इंग्लंडमध्ये भेटणार आहे.
पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसिम खान यांनी सांगितले की, ” शोएब आपल्या कुटुंबियांपासून पाच महिने दूर आहे. त्यामुळे त्याला आपल्या कुटुंबियांना भेटण्याची इच्छा आहे. ही त्याची विनंती आम्ही मान्य केली आहे. सध्याच्या घडीला बऱ्याच सवलती सुरु झाल्या आहेत, त्यामुळे आम्ही शोएबला कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देत आहेत. शोएब कुटुंबियांना भेटल्यावर थेट इंग्लंडला रवाना होणार आहे.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times