वाचा-
वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात एखाद्या संघाने घरच्या मैदानावर विश्वचषक उंचावण्याची ही पहिलीच वेळ होती. पण अंतिम सामना फिक्स झाल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली. भारताने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा श्रीलंकेचे क्रीडा मंत्री महिंदनंदा अलूठगमगे होते. ‘न्यूज फर्स्ट’ला दिलेल्या मुलाखतीत महिंदनंदा म्हणाले की, ” विश्वचषकातील अंतिम सामना हा फिक्स करण्यात आला होता, हे यापूर्वीही मी सांगितले आहे. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे आणि जर कोणाला याबाबत वाद विवाद करायचा असेल तर त्यासाठी मी सज्ज आहे. मी यामध्ये खेळाडूंना सहभागी करणार नाही, पण काही समूहांनी मिळून हा सामना फिक्स केला होता.”
वाचा-
लंकेच्या माजी क्रीडामंत्र्यांच्या आरोपावर आता त्याच देशाच्या एका माजी कर्णधाराने आणि २०११च्या वर्ल्ड संघाच्या निवड समितीचे प्रमुख असलेल्या यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. आणि भारतीय क्रिकेट चाहत्याचा विचार करून तरी या फिक्सिंग आरोपाची चौकशी झाली पाहिजे.
वाचा-
जेव्हा अशा प्रकारचे गंभीर आरोप केले जातात तेव्हा याचा परिणाम अनेक लोकांवर होतो. यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयने याची चौकशी केली पाहिजे, असे डिसिल्वाने म्हटले आहे. ज्या पद्धतीने आम्ही वर्ल्ड विजयाचा आनंद साजरा केला. त्याच पद्धतीने सचिन आणि भारतातील कोट्यवधी चाहत्यांनी तो आनंद साजरा केला. भारत सरकार आणि क्रिकेट बोर्डाचे हे कर्तव्य आहे की त्यांनी याची चौकशी करावी.
वाचा-
सचिन तेंडुलकरचा हा अखेरचा वर्ल्ड कप होता आणि त्याच्या करिअरमधील ही एकमेव वर्ल्ड कप विजेतेपद आहे. ही चौकशी यासाठी महत्त्वाची आहे की पुन्हा अशा प्रकारचे आरोप होऊ नयेत. भारताने खरच एक वर्ल्ड कप जिंकला होता, हे समोर आले पाहिजे, असे डिसिल्वा म्हणाला.
वाचा-
अंतिम फेरीत श्रीलंकेने प्रथम फलंदाजी केली होती. प्रथम फलंदाजी करत असताना श्रीलंकेने महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर २७४ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी २७५ धावांची गरज होती. भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली नव्हती. कारण भारताने माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना लवकर गमावले होते. त्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण होते. पण त्यानंतर गौतम गंभीर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताचा अष्टपैलू युवराज सिंगने हा विश्वचषक गाजवला होता. या विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी करत युवराज हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. अंतिम फेरीतील गौतम गंभीरची खेळी आणि त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विजयी षटकार अजूनही कोणी विसरू शकलेला नाही.
हे देखील वाचा-
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times