र्धेत भारताची कामगिरी शानदार अशी होती. साखळी फेरीतील पहिल्या तिनही लढतीत टीम इंडियाने विरुद्ध संघाला संधी दिली नव्हती. अशाच भारताची लढत होती ती अफगाणिस्तान संघाविरुद्ध, हा सामना भारतासाठी सोपा मानला जात होता. पण प्रत्यक्षात सामना सुरू झाल्यानंतर चित्र बदलले. साउथ हॅम्पटन येथे झालेल्या सामन्यात भारत हारता हारता जिंकला. भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो जलद गोलंदाज . या सामन्यात शमीने हॅटट्रिक घेतली. वर्ल्ड कप क्रिकेटमधील भारतीय संघाकडून झालेली ही दुसरी हॅटट्रिक होती.
वाचा-
साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला फक्त २२४ धावांवर रोखले. भारताकडून कर्णधार विराट कोहली (६७) आणि केदार जाधव (५२) यांनी अर्धशतकी खेळी केली.
२२५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तान संघाने विजयाचे लक्ष्य जवळ जवळ गाठले होते. अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने गोलंदाजीत ३३ धावा देत २ विकेट तर नंतर ५५ चेंडूत ५२ धावा केल्या. नबी संघाला वर्ल्ड कपमधील पहिला विजय मिळवून देईल असे वाटत असताना शमीने हॅटट्रिक घेतली.
वाचा-
शमी ४९व्या षटकात गोलंदाजीला आला तेव्हा अफगाणिस्तानला १६ धावा हव्या होत्या. पहिल्या दोन चेंडूवर त्यांनी ४ धावा घेतल्या. आता अखेरच्या ४ चेंडूत १२ धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर नबीने शमीचा चेंडू हवेत खेळला आणि लॉन्ग ऑनला हार्दिक पंड्याने कॅच घेतला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर शमीने आफताबची बोल्ड घेतली आणि अखेरच्या चेंडूवर मुजीब बोल्ड घेत त्याने हॅटट्रिक पूर्ण केली.
भारताने हा सामना ११ धावांनी जिंकला. वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारा शमी दुसरा भारतीय तर नववा गोलंदाज ठरला. त्याआधी चेतन शर्माने १९८७च्या वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेतली होती.
वाचा-
वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारे गोलंदाज
>> चेतन शर्मा (१९८७)
>> सकलेन मुश्ताक (१९९९)
>> चमिंडा वास (२००३)
>> ब्रेट ली (२००३)
>> लसित मलिंगा (२००७)
>> केमार रोच (२०११)
>> लसित मलिंगा (२०११)
>> स्टीव्ह फिन (२०१५)
>> जेपी डुमिनी (२०१५)
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times