कधी कधी एखादी गोष्ट घडते की, त्यामुळे एकच गोंधळ उडालेला पाहायला मिळतो. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या निधनाचे वृत्त चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. हे वृत्त देशाच्या क्रिकेट मंडळानेच ट्विट करून सांगितले होते. पण त्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले.

पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने क्रिकेटपटू मोहम्मद इरफानचे निधन झाले असल्याचे एक ट्विट केले. त्यानंतर चाहत्यांनी इरफान श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. पण या सर्व प्रकारानंतर आपण जीवंत असल्याचेच ट्विट इरफानने केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सोशल मीडियावर एकच गोंधळ झालेला पाहायला मिळाला.

पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने इरफानचे निधन झाल्याचे ट्विट केले. त्यानंतर इरफानला बरेच फोन आले. त्याच्या कुटुंबियांकडेही बऱ्याच लोकांनी विचारपूस केली आणि या सर्व गोष्टीला तो वैतागला. त्यामुळेच त्याने एक ट्विट केले आणि यामध्ये त्याने सांगितले की, ” माझ्या निधनाची बातमी खोटी आहे. या गोष्टीमुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना बराच त्रास सहन करावा लागला आहे. माझा रस्ते अपघातात निधन झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. मी माझ्या घरीच असून सुरक्षित आहे.”

नेमके घडले तरी काय…सध्याच्या जग जलदगतीने धावत आहे. त्यामुळे थांबण्याचा किंवा उसंत घेण्याचा वेळ बऱ्याच जणांकडे नसतो आणि त्यामुळे असे गोंधळ घडत असतात. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने इरफानचे निधन झाले असल्याचे एक ट्विट केले. पण ते ट्विट त्यांनी पूर्णपणे समजून घेतले नाही. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आपल्या ट्विटबरोबर एक फोटोही पोस्ट केला, पण त्याकडे चाहत्यांनी दुर्लक्ष केले आणि हा सर्व प्रकार घडल्याचे आता समोर येत आहे.

मोहम्मद इरफान हा पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळलेला असून तो आपल्या उंचीनुळे सर्वांच्याच लक्षात राहीला. त्यामुळे जेव्हा पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने इरफानच्या नावाने ट्विट केले, तेव्हा त्याचेच निधन झाले असे चाहत्यांना वाटले. पण पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने राष्ट्रीय कर्णबधिर संघातील मोहम्मद इरफानचे निधन झाल्यावर हे ट्विट केले आहे. या ट्विटखाली त्यांनी या मोहम्मद इरफानचा फोटोही दाखवला आहे. पण चाहत्यांच्या चुकीमुळे ही गोष्ट घडलेली पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here