wweमध्ये गेल्या तीस वर्षांपासून अंडरटेकर हा कुस्ती खेळत होता. ही कुस्ती फ्री-स्टाइल प्रकारची असायची. wweमध्ये डेडमॅन या नावाने अंडरटेकर हा प्रसिद्ध होता. तो जेव्हा रिंगमध्ये जाण्यासाठी तयार व्हायचा, तेव्हा सर्व लाईट्स बंद करण्यात यायच्या. सुरुवातीला त्याच्याबरोबर एक कलश घेऊन व्यक्ती यायची. या डेडमॅनच्या अस्थी या कलशामध्ये आहेत, अशी त्यावेळी अफवाही पसरली होती.
wweमधील अंडरटेकरची एंट्री ही भन्नाट असायची. सर्व लाइट्स बंद असताना अंडरटेकर यायचा. काळे कपडे त्याने परीधान केले असायचे, त्याचबरोबर काळी हॅटही तो वापरायचा. अंडरटेकरची एंट्री एवढी भितीदायक होती की, त्यावेळी बरीच लहान मुलं घाबरायची. अंडरटेकरचे डोळे पाहण्यासाठीही बरेच चाहते उत्सुक असायचे. कालांतराने अंडरटेकरबरोबर असलेली कलश घेऊन असलेली व्यक्ती नाहीशी झाली. त्यानंतर कालांतराने केन हा अंडरटेकरचा भाऊ असल्याचे चाहत्यांना समजले आणि चाहत्यांनी त्याला रिंगमध्ये पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. केन हा तोंडाला एक वेगळेच मास्क लावून यायचा. केन आणि अंडरटेकर यांच्यातील लढत चांगलीच रंगायची. कारण या लढतीमध्ये बरीच नाट्यही पाहायला मिळायची.
आज अखेर अंडरटेकरने आपली निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला सलाम ठोकत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रोहित शर्मा दाखवण्यात आला आहे आणि त्याच्याकडे अंडरटेकरसारखा बेल्ट असल्याचे पाहायला मिळत आहे. हा बेल्ट रोहितने दोन्ही हाताने उंचावलेला पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times