भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक शत्रू आहेत. त्यामुळे या दोन्ही देशांतील प्रत्येक घटना ही फार मोठी ठरत असते. जेव्हा या दोन देशांचे सामना होतात तेव्हा त्यांनाही युद्धाचे स्वरुप प्राप्त झालेले असते. कारण दोन्ही देशांतील लोकांना आपणच जिंकायला हवे, असेच वाटत असते. त्यामुळे सानिया आणि शोएब यांनी जेव्हा लग्न केले तेव्हा त्यांचाही काही जणांनी तिरस्कार केला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमुळे सानिया आणि शोएब यांना लग्न करायला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यांच्या लग्नावरून बरेच वाद विवादही झाले होते. पण या दोघांनी १२ एप्रिल २०१० या दिवशी लग्न केले होते. त्यानंतर २०१२ सालापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडले आणि त्यामुळेच २०१२ सालानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विपक्षीय मालिकाही खेळवली गेली नाही. काही दिवसांपूर्वीच शोएबने आपल्या लग्नाबाबत एक खुलासा केला होता आणि यावेळी आपल्या लग्नाच्या निर्णयाबाबत त्ययाने सांगितले होते. आपण या दोन देशांतील संबंधांबाबत चिंतीत नव्हतो, असे त्याने म्हटले होते.
शोएबच्या म्हणण्यानुसार, “लग्न करण्यासाठी प्रेम महत्वाचे असते. त्यासाठी समोरच्या व्यक्तीचा देश कोणता आहे, हे आपण पाहायचे नसते. लग्न करताना तुमचा साथीदार कोणत्या देशाचा आहे, याचा विचार करायचा नसतो. दोन्ही देशांतील संबंध कसे आहेत, त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये काय राजकारण सुरु आहे, हे पाहणे आपले काम नाही. जर एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असेल तर तुम्ही तिच्याबरोबर लग्न करायला हवे, भले ती व्यक्ती कोणत्याही देशाची असो.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times