सध्याच्या घडीला एक धक्कादायक बाब पुढे आली असून पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पाकिस्तानचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज झाला होता. पण आता त्यांच्या संघातील तीन खेळाडूंना करोना झाल्यामुळे दौरा करायचा की पुढे ढकलायचा हा प्रश्न आता पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाला पडला असेल.

पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना आता करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शादाब खान, हारिस रौफ आणि हैदर अली, अशी या करोना झालेल्या तीन क्रिकेटपटूंची नावे आहेत. पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या वैद्यकीय सल्लागारांनी या तिघांना संघापासून दूर ठेवण्यास सांगितले असून त्यांना आता क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

पाकिस्तानचा संघ इंग्लंडमध्ये जाऊन तीन कसोटी आणि तीन ट्वेन्ट-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सर्व खेळांडूचा सराव लाहोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आयोजित करण्याचे मिसबाह यांनी बोर्डाला सांगितले होते. पण बोर्डाने यावेळी मिसबाह यांना ३० खेळाडूंची व्यवस्था राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये होऊ शकत नाही, असे म्हणत नकार दिल्याचे समजले होते. त्यामुळे तीस खेळाडूंना एकत्रितपणे पाकिस्तानचे बोर्ड ठेवू शकत नाही का, हा सर्वात मोठा प्रश्न होता. पण त्यानंतर सरावाला सुरुवात करण्यात आली होती आणि इंग्लंड दौऱ्यासाठी आपला संघही पाकिस्तानने जाहीर केला होता.

करोना व्हायरसचा प्रसार सुरु असला तरी आता सर्वच देश सावरत आहेत. क्रीडा विश्वही सावरत असून पाकिस्तानचा क्रिकेट संघ तर पुढच्या महिन्यात थेट इंग्लंडच्या दौऱ्यावर निघाला आहे. पण या खेळाडूंची व्यवस्था पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून होत नसल्याचे पाहायला मिळाले होते. पाकिस्तानचा संघ पुढच्या महिन्यात दौऱ्यावर जाणार आहे, त्यामुळे या महिन्यात त्यांना सराव करायचा आहे. यासाठी संघाचे प्रशिक्षक मिसबाह उल हक यांनी पीसीबीकडे सर्व खेळाडूंनी एकत्र आणण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंचा सरावही झाला होता आणि इंग्लंडला जाण्यासाठी त्यांचा संघही निवडला गेला होता. पण याच संघातील आता तीन खेळाडूंना करोना झाल्याचे समोर आले आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here