भारतचा सलामावीर शिखर धवनच्या बाबतीत एक वाईट प्रसंग आज घडला. धवनचा लहान मुलगा असलेल्या झोरावर याच्यावर काही व्यक्तींनी वर्णद्वेषाची टीका केली. पण या टीकेला आता धवनची पत्नी आयेशाने आता सडेतोड उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे.

शिखर आणि आयेशा यांचे २०१२ साली लग्न झाले. त्यानंतर २०१४ साली त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव त्यांनी झोरावर ठेवले आहे. आता या जवळपास सहा वर्षाच्या मुलावर वर्णद्वेषाची टीका करण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

अमेरिकेमधील जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाबाबत जगभरात आंदोलन सुरु आहे. काही क्रिकेटपटूंनीही यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरन सॅमीने तर आपल्याला भारतीय खेळाडूंनी वर्णद्वेषाचे शिकार बनवले होते, अशी जोरजार टीकाही केली होती. त्याचबरोबर वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो यांनीही याबाबत आपला आवाज उठवला होता.

धवनच्या मुलाचे वय फक्त सहा वर्षे आहे. त्याला वर्णद्वेषाची टीका समजू तरी शकते का, याचा विचार टीकाकाराने केलेला दिसत नाही. मूळात वर्णद्वेषाची टीका का करावी, हाच मोठा प्रश्न आहे. पण तरीही एका व्यक्तीने आज झोरावरला तू ‘ब्लॅक’ असल्याचे म्हटले होते. त्याच्या या टीकेवर धवनची पत्नी आयेशा तुटून पडली आहे.

याबाबत आयेशाने सांगितले की, ” माझ्या मुलाच्या रंगावर लोकांचं बारीक लक्ष आहे, हे ऐकून मला धक्का बसला आहे. कोणती व्यक्ती कशी जन्माला येते, यामुळे खरंच फरक पडतो का? भारतामधील लोकांचा रंग सर्वात निराळा आहे. त्यामुळे काही जणांना भारतीयांच्या रंगाबाबत समस्या आहे. पण ही गोष्ट कितपत योग्य आहे, याचा विचार करायला हवा.”

सध्याच्या घडीला जग भरपूर बदलेले आहे. पण तरीही काही लोकं ही रंगावरच अडकून पडलेली पाहायला मिळतात. सर्वांना समान न्याय, हक्क मिळायचा हवेत, याबाबतचे नियमही करण्यात आले आहेत. पण काही लोकं आपल्या या जुनाट चौकटीतून बाहेर येताना दिसत नाहीत आणि त्यामुळेच अशा दुर्दैवी गोष्टी पाहायला मिळत आहेत.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here