काही दिवसांपूर्वी आपल्या न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन चर्चेत आली होती. आता हसीनने एका बॉलीवूडच्या गाण्यावर डान्स केला असून हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

शमीची पत्नी हसीन जहाने न्यूड फोटो शेअर केला होता. या न्यूज फोटोमध्ये आपल्याबरोबर असलेली व्यक्ती ही शमी असल्याचेच तिने सांगितले होते. या फोटोमध्ये तिने एक मेसेज लिहला होता. या मेसेजमध्ये तिने शमीवर आरोप करण्याची संधी सोडली नव्हती. हसीनने जेव्हा शमीवर आरोप केले होते, तेव्हा ती चांगलीच ट्रोल झाली होती. त्याचबरोबर शमीने हसीनला यावेळी उत्तरही दिले होते.

हसीनने आता एक आपला नवीन व्हिडीओ बनवला आहे आणि हा व्हिडीओ चांगलाच गाजत आहे. या व्हिडीओमध्ये हसीनने सोल्जर या बॉबी देओल आणि प्रिती झिंटा यांच्या चित्रपटातील गाण्यावर डान्स केल्याचे पाहायला मिळत आहे. हसीन एका एका गार्डनमध्ये या गाण्यावर डान्स करत असून हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. हसीनचे आतापर्यत बरेच व्हिडीओ या लॉकडाऊनच्या काळात आलेले आहेत आणि सोशल मीडियावर तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हसीनने काही दिवसांपूर्वी एका पार्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये हसीन एका मैत्रिणीबरोबर होती. हसीनची ही मैत्रिण हुक्का ओढत आहे, त्याचबरोबर ती मद्यपान करत असल्याचेही पाहायला मिळत होती. यावेळी पार्टीमध्ये एक पंजाबी गाणं सुरु होते. या गाण्यावर हसीन आणि तिची मैत्रिण डुलत असल्याचे पाहायला मिळत होते.

काही दिवसांपूर्वी शमीने करोना लॉकडाऊनमुळे घरी जाणाऱ्या गरजूंना मदत करत असल्याचा फोटो शेअर केला होता. स्वत: शमी प्रवासी मजूरांना जेवण आणि फळ देत होता. याचवेळी शमीने पत्नी हसीनाने केलेल्या आरोपांना उत्तर दिले. तिने केलेले सर्व आरोप निराधार आणि चुकीचे आहेत. हसीनाने हे आरोप सिद्ध करून दाखवावेत. माझा आता हसीनासोबत काहीही संबंध नाही, असेही सांगितले होते.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here