पाकिस्तानचे खेळाडू आपल्या देशातच सुरक्षित नाही, अशी खोचक टीका एका माजी दिग्गज क्रिकेटपटूने केली आहे. कारण काल पाकिस्तानच्या खेळाडूंच्या करोना चाचणीचा अहवाल आला होता. या अहवालानंतर पाकिस्तानचे एकूण १० खेळाडू करोना बाधित असल्याचे पाहायला मिळाले होते.

परवा पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना करोना झाल्याचे समोर आले होते. शादाब खान, हारिस रौफ आणि हैदर अली, अशी या करोना झालेल्या तीन क्रिकेटपटूंची नावे होती. पण काल संघातील अन्य सात खेळाडूंना करोना झाल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तान संघातील करोना झालेल्या खेळाडूंची संख्या आता १० एवढी झालेली होती. पाकिस्तानच्या संघाबरोबर असलेल्या सपोर्ट स्टाफमधील व्यक्ती मासीर मलिंग अली यांची करोना चाचणीही पॉझिटीव्ह आलेली होती.

पाकिस्तानचे १० खेळाडू करोना बाधित असल्यामुळे आता ते इंग्लंड दौऱ्याचे स्वप्न कसे काय बघू शकतात, असा सवालही विचारला जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा इंग्लंड दौरा हा संकटात आल्याचे म्हटले जात आहे. कारण ज्या संघातील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात करोना झाला आहे त्यांच्याबरोबर कोणता देश क्रिकेट सामने खेळणे पसंत करेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

याबाबत वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज खेळाडू मायकल होल्डिंग यांनी पाकिस्तानच्या संघावर टीका केली आहे. होल्डिंग म्हणाले की, ” पाकिस्तानच्या संघातील १० खेळाडू करोना बाधित होणे हे धक्कादायक आहे. याचा अर्थ असा निघतो की, पाकिस्तानचे खेळाडू आपल्या देशातच सुरक्षित नाहीत. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंनी इंग्लंडमध्ये यावे, जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील. कारण इंग्लंडमध्ये आल्यावर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या १४ दिवसांमध्ये त्यांची प्रकृती अधिक चांगली होऊ शकते.”

इंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला होता. काल संघातील सर्व खेळाडूंचा अहवाल आला. त्यावेळी पाकिस्तानच्या सात खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या संघात भितीचे वातावरण होते. पण या संघातील अनुभवी खेळाडूने आज करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या करोना चाचणी अहवालावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.

काल करोना झालेला आणि आज करोना निगेटीव्ह झालेला खेळाडू आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल. तर हा पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू आहे मोहम्मद हफिझ. काल पाकिस्तान संघाचा अहवाल आल्यावर त्याला करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आज या खेळाडूने कुटुंबियांबरोबर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे आता कोणता अहवाल खरा आणि कोणता खोटा, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here