भारताच्या एका खेळाडूवर शिक्का बसलेला होता. हा खेळाडू फक्त वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येच चांगली कामगिरी करू शकतो, असे म्हटले जात होते. पण या खेळाडूवरचा शिक्का पुसून टाकला तो रवी शास्त्री यांनी.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे बऱ्याचदा ट्रोल झालेले आपण पाहिले आहे, पण त्यांची चांगली कामं मात्र लोकांपर्यंत पोहोचताना दिसत नाही. मनात कोणताही गंड न ठेवता फक्त कामगिरीच्या जोरावर त्यांनी खेळाडूंना पारखले असून योग्य वेळी त्यांना संधी दिल्याचेही पाहायला मिळाले आहे.
ही गोष्ट आहे भारताच्या एका गोलंदाजाची. सध्याच्या घडीला जगातील अव्वल गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. पण या गोलंदाजाला परीपूर्ण बनवले ते रवी शास्त्री यांनी. कारण या गोलंदाजाला संधी द्यायची की नाही, याबाबत बराच विचार सुरु होता. पण रवी शास्त्री यांनी या गोलंदाजावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर या गोलंदाजाने मागे वळून पाहिले नाही.
नेमके घडले तरी काय…भारताचा एक गोलंदाज वनडे आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. पण कसोटी क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. पण मर्यादीत क्रिकेटचा गोलंदाज, असा ठपका त्याच्यावर काही जणांनी ठेवला होता. पण कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी हा गोलंदाज आतून होता. त्यावेळी रवी शास्त्री यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला कसोटी संघात स्थान दिले. सध्याच्या घडीला तो भारताचा मुख्य गोलंदाज बनलेला आहे.
हा खेळाडू आहे तरी कोण…सध्याच्या घडीला भारतीय गोलंदाजी ही अव्वल दर्जाची असल्याचे म्हटले जाते. या गोलंदाजीच्या ताफ्यातील जसप्रीत बुमराची ही गोष्ट आहे. बुमराला ट्वेन्टी-२० गोलंदाज म्हणून समजले जायचे. पण त्याला कसोटी संघात स्थान दिले ते रवी शास्त्री यांनी. याबाबतचा खुलासा भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी स्पोर्ट्सकीडाला मुलाखत देताना सांगितले होते.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times