नवी दिल्ली: जागतिक वनडे क्रिकेटमधील पहिला धक्कादायक विजय कोणत्या संघाने मिळवला या प्रश्न उत्तर निश्चितपणे असे द्यावे लागले. आजपासून ३७ वर्षापूर्वी भारतीय संघाने क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला होता. क्रिकेटमध्ये कोणालाही वाटले नव्हे की भारतासारखा तुलनेत कमकूवत असलेला संघ वेस्ट इंडिज सारख्या तगड्या संघाचा पराभव करेल. २५ जून १९८३ रोजी शनिवार होता आणि संपूर्ण देशात जणू संचारबंदी होती.

वाचा-
लॉर्ड्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अंतिम लढत होती. वेस्ट इंडिज संघाने सलग दोन वर्ल्ड कप जिंकले होते आणि ते सलग तिसऱ्या फायनलमध्ये पोहोचले होते. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव ५४.४ षटकात फक्त १८३ धावांवर संपुष्ठात आला. के.श्रीकांत यांनी सर्वाधिक ३८ धावा तर मोहिंदरअमरनाथ यांनी २६ धावा केल्या. त्याआधीच्या सामन्यात झिम्बब्वे विरुद्ध नाबाद १७५ धावांची वादळी खेळी करणारा भारताचा कर्णधार फक्त १५ धावा करून बाद झाला.

वाचा-
तिसऱ्या विश्व विजयासाठी फक्त १८६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने जल्लोषाची तयारी केली होती. पण टीम इंडियाच्या मनात काही वेगळेच सुरू होते. वेस्ट इंडिजची पहिली विकेट ५ धावांवर पडली. त्यानंतर पुढच्या ६१ धावात वेस्ट इंडिजची अवस्था ५ बाद ६६ अशी झाली. वेस्ट इंडिजची पाचवी विकेट त्यांचा कर्णधार सर क्लाइव्ह लॉईड यांची होती. या सामन्यात कपिल देवने व्हिव्ह रिचर्ड्सचा शानदार असा कॅच घेतला होता.

त्यानंतर वेस्ट इंडिजा डाव ५२ षटकात १४० धावात संपुष्ठात आला आणि भारताने ४३ धावांनी विजय मिळवत पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. भारताकडून अमरनाथ आणि मदनलाल यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या होत्या.

वाचा-

फक्त मिळाले होते एक एक लाख
कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने २०११ साली दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. या विजेत्या संघातील खेळाडूंना बीसीसीआयने दोन कोटी दिले होते. पण ८३च्या विजेत्या संघातील खेळाडू इतके नशिबवान नव्हते. लता मंगेशकर यांनी नॅशनल स्टेडियमवर एक कार्यक्रम केला होता. यातून जमा झालेल्या पैशातून प्रत्येक खेळाडूला एक-एक लाख रुपये देण्यात आले होते.

भारतीय संघाच्या या यशाने देशात क्रिकेटचे एक वातावरण तयार झाले. या विजेतेपदाने पुढची पिढी तयार झाली.

कपिल देव यांनी दिले प्रोत्साहन
आम्ही १८३ धावा केल्यामुळे विजयाची थोडीही आशा नव्हती. पण तेव्हा कपिल देवने संघाला प्रोत्साहन दिले. जर आपण १८३ बाद झालो असलो तरी आव्हान देऊ शकतो. हा सामना आपण सहजा सहजी गमवायचा नाही, कपिलचे ते शब्द भारतीय संघासाठी टर्निग पाईंट ठरले. जेव्हा क्रिकेटवर वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांचा दबदबा होता. तेव्हा अंडरडॉग भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला होता.

भारतीय संघ जेव्हा फायनलमध्ये पोहोचला होता. तेव्हा बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला २५ हजार रुपये बोनस दिला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here