नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाने १९८३ साली वेस्ट इंडिजला धक्का देत पहिल्या वर्ल्ड कपवर नाव कोरले. या विजयासह भारताने वेस्ट इंडिजचे सलग तीन वर्ल्ड कप जिंकण्याच्या स्वप्नावर पाणी फेरले. दिग्गज संघांना मागे टाकत भारत जेव्हा अंतिम फेरीत पोहोचला होता तेव्हा कोणालाही वाटले नव्हे की हा अंडरडॉग संघ विजेतेपद मिळवेल. पण कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक विजय साकार केला. भारताने मिळवलेल्या या विजयाला ३७ वर्ष झालीत तरी त्याच्या आठवणी अद्याप ताज्या आहेत.

वाचा-

वर्ल्ड कप जिंकल्यानंतर एका मुलाखतीत म्हणाले, मला कप घेऊ लवकरात लवकर संघातील खेळाडूंच्या जवळ जायचे होते. चषक हाती देणारी व्यक्ती माझ्याशी बरच काही बोलत होती. पण त्यातील एकही गोष्ट मला समजत नव्हती. कसे तरी करून मला संघाच्या जवळ जायचे होते आणि जल्लोष करायचा होता.

त्याकाळी खेळाडूंना दौऱ्यावर फार पैसे मिळायचे नाहीत. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जेव्हा आम्ही हॉटेलवर पोहोचलो. तेव्हा प्रत्येक खेळाडू ड्रिंक्स घेत होते. एका बाजूला जल्लोष सुरू होता. पण इकडे कपिलला दुसऱ्याच गोष्टीचे टेन्शन आले. बोर्डाने खेळाडूंना मर्यादीत पैसे दिले होते. अशा परिस्थितीत या पार्टीचे पैसे कोणत देणार याची चिंता कपिलला होती. एका मुलाखतीत या घटनेबद्दल बोलताने ते गंमतीने म्हणाले, तेव्हा वाटत होते की हॉटेलमध्ये भांडी घासावी लागतील.

वाचा-
कपिलला आज देखील एका गोष्टी आश्चर्य वाटते की, त्या पार्टीचे पैसे कोणी दिले. या रात्री आम्ही गेलेल्या पार्टीचे पैसे कोणी दिले ही गोष्ट त्यांना आज देखील माहिती नाही.

अंतिम सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा करणारे कृष्मणचारी श्रीकांत म्हणाले, मला विश्वासच बसत नव्हता की आम्ही वर्ल्ड कप जिंकला. या गोष्टीवर विश्वास बसावा म्हणून मी जवळपास २० सिगारेट ओढल्या होत्या. मी कदाचीत एकमेव व्यक्ती असेन ज्याने लॉर्ड्सच्या बाल्कनीत सिगारेट ओढल्या असतील.

वाचा-

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताने २०११ साली दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकला. या विजेत्या संघातील खेळाडूंना बीसीसीआयने दोन कोटी दिले होते. पण ८३च्या विजेत्या संघातील खेळाडू इतके नशिबवान नव्हते. लता मंगेशकर यांनी नॅशनल स्टेडियमवर एक कार्यक्रम केला होता. यातून जमा झालेल्या पैशातून प्रत्येक खेळाडूला एक-एक लाख रुपये देण्यात आले होते. भारतीय संघ जेव्हा फायनलमध्ये पोहोचला होता. तेव्हा बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला २५ हजार रुपये बोनस दिला होता. भारतीय संघाच्या या यशाने देशात क्रिकेटचे एक वातावरण तयार झाले. या विजेतेपदाने पुढची पिढी तयार झाली.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here