भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे संबंध आहेत. कारण भारताला पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, पण दुसरीकडे पाकिस्तानला भारताची मदत हवी आहे. त्यामुळे आता भारताकडून लिखीत हमी घेण्यासाठी पाकिस्तान नवा डाव आखत असल्याचे पाहायला मिळत आहे.

एकिकडे पाकिस्तान हा भारताची अडवणूक करत असल्याचे पाहायला मिळते, त्याचबरोबर दुसरीकडे त्यांना भारताची मदतही हवी असते. भारताकडून आताही त्यांना एक मदत हवी आहे. पण भारत ही मदत करेल की नाही, याबाबत त्यांच्या मनात साशंकता आहे. त्यामुळेच त्यांनी भारताकडून लिखीत हमी त्यांना हवी आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध चांगला नाहीत. दुसरीकडे या दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांमध्येही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच बीसीसीआय जिथे आयपीएल खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे आयपीएल होऊ नये यासाठी पाकिस्तानने कंबर कसली आहे. कारण आयपीएलमुळे पाकिस्तानला कोणताही फायदा होणार नाही. कारण त्यांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीत. त्यासाठी पहिल्यांदा आशिया चषक खेळवायला हवा, अशी भूमिका पाकिस्तानने मांडली होती.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये २०१२ सालापासून एकही क्रिकेटची मालिका झालेली नाही. त्याचबरोबर पाकिस्तानचा क्रिकेट संघही गेल्या काही वर्षांमध्ये भारतात आलेला नाही. पण आता भारतामध्ये पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर २०२३ साली भारतामध्ये वनडे विश्वचषकही होणार आहे. त्यामुळे या दोन्ही मोठ्या स्पर्धांसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांना भारतात येण्याची परवानगी मिळावी, यासाठी पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हिसासाठी जर आपण थेट विचारले तर भारत आपल्याला रखडवून ठेवेल आणि अंतिम क्षणी ते कोणताही निर्णय ते घेऊ शकतात, अशी भिती पाकिस्तानला आहे. त्यामुळे त्यांनी आता आयसीसीला या प्रकरणात खेचले आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे भारताच्या व्हिसा मिळण्यासाठी विनंती केली आहे. यासाठी आयसीसीने भारताकडून लेखील हमीपत्र घ्यावे, अशी भूमिका पाकिस्तानने मांडलेली आहे. त्यामुळे आता भारत पाकिस्तानच्या खेळाडूंना विश्वचषकासाठी व्हिसा देणार का, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here