नवी दिल्ली: करोना व्हायरसविरुद्धची लढाई जगभरातील सर्व जण लढत आहेत. या काळात लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली. फक्त सर्व सामान्य नाही तर मोठ्या कंपन्या आणि विविध देशांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही कंपन्यांनी पगार कपात तर काहींनी कर्मचारी कपात केली. या लॉकडाऊनचा फटका सारखा दिसणाऱ्या याला देखील बसला आहे.

वाचा-

बलवीर चंद हा सचिन तेंडुलकर सारखा दिसत असल्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. १९९९ साली जेव्हा दिल्लीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामना झाला. तेव्हा माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी बलवीरला कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलवले आणि नंतर सचिनची भेट देखील करून दिली. सचिन सोबत बलवीरने फोटो काढले. हा तोच सामना होता ज्यात फिरकीपटू अनिल कुंबळेने १० विकेट घेण्याचा विक्रम केला होता.

या घटनेनंतर बलवीर चंद हा सचिनच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला. त्याला अनेक जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मिळाली. तो मुंबईतील एका फास्ट फुड चेनचा ब्रॉड अॅम्बेसडर म्हणून काम करत होता. पण लॉकडाऊनमुळे बलवीरला नोकरी गमवावी लागली.

वाचा-

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना तो म्हणाला, लॉकडाऊनमुळे खुप नुकसान झाले. अनेक कर्मचाऱ्यांची नोकरी गेली. त्यात माझा देखील समावेश होता. सर्व काही सामान्य झाल्यावर मला पुन्हा नोकरी मिळणार आहे.

मुंबईत घराचे भांडे देण्यासाठी पैसे नसल्यामुळे बलवीर कुटुंबासह पंजाबला गावी आला. पण या काळात प्रवासा दरम्यान त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाला करोनाची लागण झाली. आम्ही प्रवासात काळजी घेतली होती. पण अन्य काही प्रवासी होते ते बेजबाबदारपणे वागत होते, असे तो म्हणाला.

वाचा-
प्रवासात आम्ही १५ सॅनिटायझर आणि एन ९५ मास्क घेतले होते. पण इतर प्रवासी काळजी घेत नव्हते. मी माझ्या अनुभवावरून सांगतो की या काळात प्रवास करणे अजिबात सुरक्षित नाही.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here