दैनंदिन आयुष्यात आहारामध्ये भाजी हा प्रकार भारतामध्ये असतो. पण भारताचा एक माजी क्रिकेटपटू भाजी आणायला आपल्या गाडीतून गेला होता. पण पोलिसांनी आता या क्रिकेटपटूला पकडले असून त्याची गाडी ताब्यात घेतल्याची घडना घडलेली आहे. हा माजी क्रिकेटपटू आयपीएलमधील मुंबई इंडियन्स या संघाबरोबर काम करत आहे.

करोना व्हायरसमुळे सर्व शहरांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भारतामधील काही राज्यांमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आले आहे. पण काही राज्य सरकारांनी लॉकडाऊन सुरुच ठवत कठोर नियम केले आहे. हे सर्व नियम लोकांच्या भल्यासाठीच आहेत. पण या नियमांचे पालन मात्र काही वेळा लोकांकडून होताना दिसत नाही. यामध्ये आता एका क्रिकेटपटूचेही नाव आले आहे.

वाचा-

सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये तरी लॉकडाऊन नाही. त्यामुळे बरेच दैनंदिन व्यवहार सुरु झाले आहेत. पण देशातील काही राज्यांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. तामिळनाडूमध्ये १९ जूनपासून १२ दिवसांचे लॉकडाऊन लावण्यात आलेले आहे. या लॉकडाऊनच्या काळात एक क्रिकेटपटू आपल्या कुटुंबियांसाठी भाजी आणायला आपल्या गाडीमधून रस्त्यावर उतरला होता. पण या क्रिकेटपटूची गाडी पोलिसांनी आता जप्त केल्याचे पाहायला मिळत आहे.

नेमके घडले तरी काय…चेन्नईमध्ये लॉकडाऊन सुरुच ठेवण्यात आले आहेत. पण अत्यावश्यक आणि दैनंदिन वापराच्या गोष्टी आणण्यासाठी काही नियम तयार करण्यात आले आहे. जर तुम्हाला दैनंदिन वापराच्या गोष्टी आणायच्या असतील तर तुम्ही घरापासून २ किलो मीटरच्या परीसरात त्या विकत घेण्यासाठी जाऊ शकता, असा चेन्नईमध्ये नियम बनवलेला आहे. पण हा क्रिकेटपटू चेन्नईतील अडयारपासून भाजी आणायला उथंडी येथे गेला होता. हे अंतर दोन किलो मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळेच पोलिसांनी या खेळाडूला पकडल्याचे पाहायला मिळाले आहे.

हा खेळाडू आहे तरी कोण…पोलिसांनी कोणत्या माजी क्रिकेटपटूला पकडून गाडी जप्त केली आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. तर चेन्नई पोलिसांनी ज्याची गाडी जप्त केली तो भारताचा माजी क्रिकेटपटू आहे रॉबिन सिंग. भारताकडून रॉबिन सिंगने बरेच आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात तो सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरतही होता.

पोलिसांनी काय सांगितले…याप्रकरणी चेन्नई पोलिसांनी सांगितले की, ” रॉबिन सिंग यांनी नियम पाळलेले नाहीत. ते दोन किलो मीटरपेक्षा जास्त अंतर कापत भाजी आणण्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांनी नियम मोडला असून त्यांची गाडीही जप्त करण्यात आली आहे. यावेळी रॉबिन सिंग यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केले आहे.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here