वेस्ट इंडिजचा धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल हा आयुष्याची मजा घेणारा खेळाडू आहे. पण एकदा आयपीएल सुरु असताना गेलला एका खेळाडूचा राग आला होता. त्यावेळी रागाच्या भरात गेल हा त्याला खेळाडूला जीवानिशी मारणार होता, असा धक्कादायक खुलासा एका भारतीय क्रिकेटपटूने केला आहे.

गेलने आपल्या धमाकेदार फलंदाजीने आपले नाव कमावले आहे. गेल सुरुवातीला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंज बंगळुरु या संघात होता. पण या संघाने काही वर्षानंतर त्याला आपल्या संघात कायम ठेवले नाही. त्यानंतर त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने आपल्या ताफ्यात घेतले आणि सध्या तो पंजाबच्या संघाडकडूनच खेळत आहेत.

आयपीएलमध्ये काही वेळेला चांगलेच घमासान पाहायला मिळते. कारण प्रत्येक खेळाडूला आपल्या संघासाठी सामना जिंकायचा असतो आणि तुम्ही जेव्हा चांगल्या फॉर्ममध्ये नसता तेव्हा तर तुम्ही अधिक आक्रमक झालेले असता. गेल असाच एकदा आक्रमक झाला होता आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूचा जीव घेणार होता. हा धक्कादायक खुलासा आयपीएलमध्ये पंजाबकडून गेलबरोबर सलामीला येणाऱ्या लोकेश राहुलने केला आहे.

नेमके घडले तरी काय…ही गोष्ट घडली ती आयपीएलच्या २०१८ साली झालेल्या हंगामात. यावेळी पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना सुरु होता. या सामन्यापूर्वी गेलला अपेक्षित चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे तो आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करत होता. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याची चांगली फलंदाजी होत होती. पण त्यावेळी एका गोलंदाजाच्या काही गोष्टी त्याला खटकल्या होत्या.

याबाबत राहुलने सांगितले की, ” या सामन्यात गेल चांगली फलंदाजी करत होता आणि आतापर्यंत चांगली कामगिरी न झाल्यामुळे त्याला संघाला हा सामना जिंकवून द्यायचा होता. यावेळी गेलपुढे मोठे आव्हान होते ते हैदराबादचा फिरकीपटू रशिद खानचे. तो मला म्हणाला की, रशिद खानने जर मला गुरगुरून दाखवले तर मी त्याला सोडणार नाही. मी त्याला संपवून टाकेन. कारण कोणत्याही फिरकीपटूने माझ्या समोर येऊन गुरगुरणे मला कदापी सहन होणार नाही.”

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here