सध्याच्या घडीला विराट कोहलीने आयपीएलमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. धावांची बरसता करत विराटने चाहत्यांना आनंद दिला आहे. त्यामुळे आता या संघाला विराटकडे पाठ फिरवल्याचे वाईट वाटत आहे. कारण विराटला आरसीबीने आपल्या संघात घेतले आणि त्याने इतिहास रचल्याचे पाहायला मिळाले.
कोणत्या संघाने विराकडे फिरवली होती पाठआयपीएलच्या पहिल्या लिलावाच्यावेळी चांगली मजा आली होती. कारण हा प्रकार भारतीय चाहत्यांसाठी नवा होता. त्यावेळी कोणता संघ कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान देणार, याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामुळे संघ मालकांसाठीही हा लिलाव सर्वात महत्वाचा होता.
२००८ साली जेव्हा पहिल्यांदा लिलाव झाला तेव्हा विराटला आपल्या संघात स्थान देण्याची संधी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडे होती. पण त्यांनी यावेळी विराटला आपल्या संघात स्थान दिले नाही. त्यांनी एका अष्टपैलू खेळाडूला संघात संधी दिली होती. पण आता मात्र विराटची फलंदाजी पाहून या संघाच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सुंदर रमण यांना वाईट वाटत आहे.
रमण यांनी यावेळी सांगितले की, ” जेव्हा पहिल्यांदा आयपीएलचा लिलाव सुरु झाला होता तेव्हा आम्हाला कोहलीला संघात स्थान देण्याची संधी होती. पण त्यावेळी आमच्या संघाची गरज वेगळी होती. कारण संघात वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, ए बी डिव्हिलियर्ससारखे नामांकित फलंदाज होते. त्यामुळे त्यांना एका गोलंदाजाची गरज होती. या लिलावापूर्वी भारताने युवा विश्वचषकही जिंकला होता. या संघाचे कर्णधारपद विराटकडेच होते. पण तरीही आम्ही एक अष्टपैलू खेळाडूसाठी संघासाठी निवडला ज्याचे नाव होते प्रदीप सांगवान. त्यामुळे त्यावेळी मला वाईट वाटले नव्हते. पण आता विराटने आरसीबीचा चेहरा-मोहरा बदलला आहे, हे पाहून थोडेसे वाईट नक्कीच वाटते.”
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times