सचिननं केला पाण्याचा गैरवापर?

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो लीग क्रिकेट मात्र अजूनही खेळताना दिसतोय. सध्या तो ‘2022 रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी20’ मध्ये इंडिया लेजंट्सचं कर्णधारपद भुषवतोय. या स्पर्धेदरम्यान सचिनने बॅटची ग्रीप कशी धुवायची याबद्दल माहिती दिली. बॅटची ग्रीप रबरापासून तयार केलेली असते. त्यामुळे त्याच्यावर चिकटपणा असतो. शिवाय काही जंतू देखील असतात. त्यामुळे क्रिकेट खेळून झाल्यानंतर ग्रीप व्यवस्थित धुवावी. पण हे काम करत असताना बॅटला पाणी लागू नये याची देखील काळजी घ्यावी. अन्यथा ग्रीपच्या नादात बॅट खराब होईल. अशी माहिती या व्हिडीओमध्ये सचिनने दिली. ‘एक वेदांता वाला आला होता…’, फॉक्सकॉन व्हिडीओ क्लिपमुळे एकनाथ शिंदे ट्रोल

४५ सेकंद नळ ठेवला सुरू

पण ही माहिती देत असताना नळ तसाच सुरू राहिला. जवळपास ४५ सेकंद नळातलं पाणी तसंच वाहात होतं. ही गोष्ट नेटकऱ्यांनी बरोबर हेरली. आणि त्यामुळे आता सचिनला ट्रोल केलं जात आहे. सचिनचा हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाख २७ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here