मनवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही सामना असला तरी तो हायव्होटेज असतो. दोन्ही देशातील तणावामुळे द्विपक्षीय मालिका होत नाही. त्यामुळे फक्त आयसीसीद्वारे आयोजित स्पर्धेत दोन्ही देश एकमेकांसमोर येतात. या दोन्ही संघात अखेरची लढत गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी वर्ल्ड कपमध्ये झाली होती.

वाचा-

वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत पाकिस्तानला कधीच भारताचा पराभव करता आला नाही. २०१९ मध्ये मॅनचेस्टर येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने पुन्हा एकदा त्यांचा पराभव करत विजयाची परंपरा कामय ठेवली होती. पण या सामन्याच्याआधी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या चाहत्याकडून भारतीय खेळाडूंना शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूने याचा खुलासा केला.

वाचा-
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैदानात जशी लढत होत असते तशी तो सामना पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये देखील असते. दोन्ही संघाचे चाहते संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित असतात. गेल्या वर्षी झालेल्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारतीय संघ कॉफी घेत असताना पाकिस्तान चाहत्याने असभ्य वर्तन करत शिविगाळ केली होती.

वाचा-
भारतीय संघातील गोलंदाज याने एका पॉडकास्ट कार्यक्रमात सांगितले की, सामन्याच्या एक दिवस आधी आम्ही कॉफी पिण्यासाठी गेले होतो. तेव्हा एका पाकिस्तानी चाहता आमच्याजवळ आला आणि शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याआधी माझा हा पहिला अनुभव होता.

भारत आर्मी या भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांशी पॉडकास्टवर बोलताना शंकर म्हणाला, संघातील काही खेळाडू माझ्या सोबत होते. तो पाकिस्तानी चाहता शिव्या देत होता. आम्ही फक्त ऐकून घेतले काहीच प्रतिक्रिया दिली नाही. शिवी देत असताना तो रेकॉर्ड करत होता. त्यामुळे आम्ही काहीच बोललो नाही. तो काय करतोय हे आम्ही सर्व जण पाहत होतो.

वाचा-
शंकरने वर्ल्ड कपमधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्याने स्पर्धेतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेत शानदार सुरूवात केली होती. शंकरने पाकच्या इमाम-उल-हकला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. या सामन्यात स्टार ठरला तो भारताचा रोहित शर्मा. त्याने ११३ चेंडूत १४० धावा केल्या. भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद ३३६ धावा केल्या. बदल्यात पाकिस्तानला ४० षटकात २१२ धावा करता आल्या.

वाचा-
पावसामुळे हा सामना ४० षटकांचा करण्यात आला होता. पण त्याचआधीच भारताने जवळपास विजय मिळवला होता. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सर्वच्या सर्व ७ लढतीत विजय मिळवला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here